Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DDLJ ची सिमरन ते कुछ कुछ होता है ची अंंजली, काजोलनं अभिनयानं जिकंली सर्वांची मनं

काजोलचा जन्म 5 ऑगस्ट 1974ला मुंबईत झाला. काजोल ही ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि दिवंगत निर्माता-दिग्दर्शक सोमू मुखर्जी यांची मुलगी आहे. काजोल एक यशस्वी अभिनेत्री असण्यासोबतच एक आदर्श मुलगी, पत्नी आणि आई आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 05, 2022 | 02:54 PM
DDLJ ची सिमरन ते कुछ कुछ होता है ची अंंजली, काजोलनं अभिनयानं जिकंली सर्वांची मनं
Follow Us
Close
Follow Us:

सावळा रंग, मनमोहक सौंदर्य, गोड आवाज आणि दमदार अभिनय यासह 90 च्या दशकात बॅालिवूडमध्ये आलेली अभिनेत्री काजल आजही रसिकांच्या ह्रदयावर राज्य करते. शाहरुख खानसोबत चित्रपटात असलेली तिची केमेस्ट्री किंवा अनेक चित्रपटातला तिचा बबली लूक आजही प्रेक्षकांना तिचे चित्रपट पाहण्यास भाग पाडतात. अशी ही अष्टपैलू अभिनेत्री आज तिचा 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसाबद्दल जाणून घेऊया तिच्याशी संबधित काही गोष्टी…

 

काजोलचा जन्म 5 ऑगस्ट 1974ला मुंबईत झाला. काजोल ही ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि दिवंगत निर्माता-दिग्दर्शक सोमू मुखर्जी यांची मुलगी आहे. काजोल एक यशस्वी अभिनेत्री असण्यासोबतच एक आदर्श मुलगी, पत्नी आणि आई आहे.

1992 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण

1992 मध्ये आलेल्या बेखुदी चित्रपटातून काजोलने बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला असला तरी काजोलचा चित्रपटातील अभिनय लोकांना फार आवडला. याच चित्रपटातील उत्तम भूमिकेमुळे काजोलला शाहरुख आणि शिल्पा शेट्टीसोबत ‘बाजीगर’ चित्रपट करण्याची संधी मिळाली, जो चित्रपट हिट ठरला होता. काजोलने पहिला चित्रपट साईन केला, तेव्हा ती अवघ्या 16 वर्षांची होती. त्यावेळी ती शाळेत शिकत होती पण चित्रपटातील करिअरमुळे तिने तिचे शिक्षण मध्येच सोडले. एवढ्या कमी वयात तिने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले.

काजोलच्या नावावर आहेत अनेक पुरस्कार

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट शाहरुख-काजोलच्याच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम चित्रपट आहे. या चित्रपटाशिवाय काजोलने “कुछ कुछ होता”, “कभी खुशी कभी गम”, “फना”, “माय नेम इज खान” या चित्रपटांसाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही जिंकला आहे. काजोलचा ‘गुप्त’ हा चित्रपट 1997 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील तिची व्यक्तिरेखा नकारात्मक अर्थात व्हिलनची होती. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला होता. इतकेच नाही तर 2011 मध्ये काजोलला पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
अजय देवगण-काजोलची पहिली भेट आणि लग्न

अभिनेता अजय देवगण सोबत लग्न

काजोल आणि अजय देवगण हलचल चित्रपटाच्या सेटवर भेटले होते, त्यानंतर ओळखींच रुपातंर मैत्रीमध्ये झाले. त्यानंतर मैत्रीचे लग्नात रुपांतर झाले आणि दोघांनी 1999 मध्ये लग्नगाठ बांधली. अजय देवगण आणि काजोलची जोडी बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट जोडींपैकी एक असल्याचं मानल्या जाते. त्यांना मुलगी न्यासा आणि मुलगा युग ही मुले आहेत.

काजोलचे गाजलेले चित्रपट

बाजीगर
करण अर्जुन
गुप्त
दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे
कुछ कुछ होता है
कभी खुशी कभी गम
माय नेम इज खान
फना
तानाजी

Web Title: Ddlg movie simran te kuch kuch hota hai anjali kajol won hearts with their performance nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2022 | 01:20 PM

Topics:  

  • bollywood actress Birthday
  • Entertainement News

संबंधित बातम्या

Varanasi: राजामौलींचे १४ वर्षांपूर्वीचे ट्विट पुन्हा चर्चेत; राम आणि हनुमान संदर्भातील वक्तव्यावर सोशल मीडियात वाद
1

Varanasi: राजामौलींचे १४ वर्षांपूर्वीचे ट्विट पुन्हा चर्चेत; राम आणि हनुमान संदर्भातील वक्तव्यावर सोशल मीडियात वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.