Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Patri Sarkar 1942 Trailer Launched: तो संवाद ऐकलात? अंगावर शहारे आणणारा ‘पत्री सरकार’चा ट्रेलर व्हायरल चर्चेत

Patri Sarkar 1942 Trailer Launched: क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ऐतिहासिक कार्यावर आधारित ‘पत्री सरकार १९४२’ या मराठी चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर आणि विशेष गाण्याचे अनावरण ईश्वरपूर येथे उत्साहात पार पडले. ट्रेलरमधील इंग्रजी सत्तेविरुद्धचे जोशपूर्ण संवाद आणि क्रांतिकारकांचा इतिहास लक्षवेधी ठरत आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 09, 2026 | 05:22 PM
Patri Sarkar 1942 Trailer Launched: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Patri Sarkar 1942 Trailer Launched: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘पत्री सरकार १९४२’ चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर ईश्वरपूर येथे प्रदर्शित.
  • अंकित मोहनच्या विशेष गाण्याचे भव्य अनावरण.
  • चित्रपट २० नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत.

Patri Sarkar 1942 Trailer Launched:  भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजी हुकूमत हादरवून सोडणारे आणि समांतर प्रतिसरकार उभारून रयतेचे राज्य निर्माण करणारे थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ऐतिहासिक पर्वावर आधारित ‘पत्री सरकार १९४२’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर आणि विशेष गाण्याचा भव्य अनावरण सोहळा काल ईश्वरपूर येथे अत्यंत दिमाखदार वातावरणात पार पडला. या सोहळ्याला चित्रपटाची संपूर्ण टीम, मान्यवर, माध्यम प्रतिनिधी आणि स्थानिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अंगावर काटा आणणारा ट्रेलर कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला.

इंग्रजी सत्तेविरुद्ध पुकारलेला एल्गार

‘पत्री सरकार’चा ट्रेलर अत्यंत प्रभावी, रोमांचक आणि देशभक्तीची भावना चेतवणारा ठरला आहे. “गोऱ्यांच्या कचेरीवर तिरंगा आपला लागलाच पाहिजे”, “पत्री सरकार हे जनतेचे सरकार आहे” आणि “शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने या इंग्रज सत्तेला परतून लावायचं” यांसारखे अंगावर शहारे आणणारे संवाद, स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे बलिदान आणि इंग्रजी सत्तेविरुद्ध पुकारलेला एल्गार ट्रेलरमध्ये प्रभावीपणे अधोरेखित झाला आहे.

मोठ्या पडद्यावर अनावरण

या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणारा लोकप्रिय अभिनेता अंकित मोहन. याप्रसंगी अंकित मोहनवर चित्रित करण्यात आलेल्या एका दमदार आणि ऊर्जावान गाण्याचे मोठ्या पडद्यावर अनावरण करण्यात आले. या गाण्याने उपस्थितांची मने जिंकून घेतली असून चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. आपल्या भूमिकेबद्दल आणि गाण्याबद्दल बोलताना अंकित मोहनने, “महाराष्ट्राच्या या सुवर्ण इतिहासाचा आणि क्रांतिसिंहांच्या विचारांचा भाग होता आले याचा मला सार्थ अभिमान आहे,” अशी भावना व्यक्त केली.

चित्रपटाला एक वेगळी धार

‘भागीरथी मोशन पिक्चर्स’च्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती विशाल गोविंदराव जाधव यांनी केली असून, चित्रपटाचे सशक्त लेखन व दिग्दर्शन मनीष अनसुरकर यांनी केले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या दमदार आवाजातील व्हॉईसओव्हरने चित्रपटाला एक वेगळी धार दिली आहे. चित्रपटात क्रांतिसिंह नाना पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेते अनिल रबाडे यांनी साकारली असून त्यांच्यासोबत अनुराधा धामणे, सिद्धार्थ बडी, शुभम गवई, रश्मी साळवी, तृप्ती शेडगे आणि पाहुणे कलाकार अंकित मोहन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित

स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीचा सुवर्ण इतिहास रुपेरी पडद्यावर जिवंत करणारा ‘पत्री सरकार’ हा चित्रपट येत्या २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.

Web Title: Patri sarkar 1942 marathi movie trailer launch release date november 20 rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Climate Change News : जीवघेण्या उष्णतेच्या लाटा आणि महापूर, हवामान बदलाचा धोका; जागतिक नेते एकत्र येणार
1

Climate Change News : जीवघेण्या उष्णतेच्या लाटा आणि महापूर, हवामान बदलाचा धोका; जागतिक नेते एकत्र येणार

Kranti Redkar’s twin daughters Look: क्रांती रेडकरच्या जुळ्या मुलींची दिवाळी स्पेशल झलक; गोड फोटोंनी जिंकली चाहत्यांची मनं
2

Kranti Redkar’s twin daughters Look: क्रांती रेडकरच्या जुळ्या मुलींची दिवाळी स्पेशल झलक; गोड फोटोंनी जिंकली चाहत्यांची मनं

Sankarshan Karhade Daughter: लेकीला 102 ताप, रात्रभर जागरण अन् सकाळी शूटिंग! संकर्षणच्या आयुष्यातला तो कठीण क्षण
3

Sankarshan Karhade Daughter: लेकीला 102 ताप, रात्रभर जागरण अन् सकाळी शूटिंग! संकर्षणच्या आयुष्यातला तो कठीण क्षण

New Caller ID Rule: Truecaller ला टक्कर! आता फोनवरच दिसणार अनोळखी कॉल करणाऱ्याचं नाव
4

New Caller ID Rule: Truecaller ला टक्कर! आता फोनवरच दिसणार अनोळखी कॉल करणाऱ्याचं नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.