Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sankarshan Karhade Daughter: लेकीला 102 ताप, रात्रभर जागरण अन् सकाळी शूटिंग! संकर्षणच्या आयुष्यातला तो कठीण क्षण

Sankarshan Karhade Daughter: मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या मुलीच्या आजारपणाचा भावुक अनुभव सांगितला. एका दिवशी रात्री साडेअकरा वाजता घरी परतल्यानंतर त्याला मुलगी स्रग्वीला 102 ताप असल्याचे समजले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 09, 2026 | 04:39 PM
Sankarshan Karhade Daughter: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Sankarshan Karhade Daughter: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

 

  • लेकीला 102 ताप, संकर्षण रात्रभर जागा.
  • खेळणं आणण्यासाठी मध्यरात्री शोधलं दुकान.
  • पहाटे 3 वाजता पुण्याला शूटिंगसाठी रवाना.

टीव्ही आणि सिनेमांमध्ये दिसणारे कलाकार हे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सतत धावपळ करत असतात. मनोरंजन सृष्टीमधील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या कलाकारांना सुद्धा भरपूर मेहनत घ्यावी लागते. त्यामध्ये कुठेतरी आपल्या कुटुंबीयांसाठीचा वेळ हा कमी पडतो. मात्र तरीही आपल्या परीने जमेल तसं ते कुटुंबाला साथ देत असतात.

कवितांचे कार्यक्रम चालू

सध्याच्या घडीला अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा भरपूर व्यस्त अभिनेता आहे. त्याचे नाटकांचे दौरे चालू आहेत, कवितांचे कार्यक्रम चालू आहेत शिवाय तो लवकरच एका चित्रपटातही दिसणार आहे. याशिवाय वेगवेगळ्या विषयांवर त्याचे लेखन चालू असते. पण तरीही वेळ मिळेल तसा तो आपल्या कुटुंबीयांना वेळ देतो. Sankarshan Karhade Daughter:

धावपळीत घरच्यांना वेळ देणं

संकर्षण कऱ्हाडे सध्या सगळ्यात बिझी कलाकारांपैकी एक आहे. नाटकं, कवितांचे कार्यक्रम, लेखन, आणि आता सिनेमा… सगळं एकाच वेळी चालू आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याचं वेळापत्रक फुल असतं. अशा धावपळीत घरच्यांना वेळ देणं खरंच अवघड असतं. पण संकर्षण मात्र जमेल तसा वेळ काढतोच.

Alia Bhatt-Ranbir Kapoor: नव्या बंगल्यात आलिया-रणबीरची पहिली दिवाळी! चिमुकल्या राहासोबत केली लक्ष्मीपूजा, पाहा घरातील सुंदर फोटो

किस्सा सांगताना तो म्हणाला

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने आपल्या लेकीचा किस्सा सांगितला. आपल्या मुलांच्या जन्मानंतर माझं माझ्या वडिलांशी असलेलं नातं हे अधिक घट्ट झालं असं त्याने सांगितलं. यासंदर्भातला किस्सा सांगताना तो म्हणाला की, मध्यंतरी मला पुण्याला एका शूटसाठी जायचं होतं. माझं सकाळी सात वाजता शूटिंग होतं. मी त्यादिवशी मुंबईत प्रयोग करून रात्री साडेअकराला घरी आलो. त्यावेळी मी घरच्यांना केवळ हाय बाय करून दोन-तीन तास झोपून लगेचच प्रयोगासाठी निघणार होतो. घरी आल्यावर बायको म्हणाली की स्रग्वीला म्हणजेच माझ्या मुलीला 102 ताप आहे. त्यावेळी साडेअकरा वाजले होते, सातचं शूटिंग होतं.

अशा वेळी काय करायचं?

विचार करा, दिवसभर नाटकाचा प्रयोग करून रात्री साडेअकराला घरी यायचं, आणि समोर कळतं लेकीला 102 ताप आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता पुण्याला शूटिंग आहे. अशा वेळी काय करायचं? बहुतेक लोक म्हणतील, “औषध दिलंय ना, मी झोपतो, सकाळी निघायचंय.” पण संकर्षणने तसं केलं नाही.

लहान मुलांना थोडं खेळण्यांमध्ये गुंतवलं

संकर्षण पुढे म्हणाला की, मी मुलीचा थोडा ताप उतरून दे मग निघू असा विचार केला आणि तीन वाजेपर्यंत तिथेच थांबलो. तिच्या डोक्यावर गार पाण्याच्या पट्ट्या वगैरे ठेवल्या. त्यादिवशी रात्री साडेअकरा वाजता मी एक दुकान शोधलं. तिथून मी तिच्या आवडीचा युनिकॉन घोडा आणला कारण लहान मुलांना थोडं खेळण्यांमध्ये गुंतवलं की ते विचलित होतात.

OTT Releases This Week: घरबसल्या मनोरंजनासाठी सज्ज व्हा! या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार ५ जबरदस्त चित्रपट आणि सीरिज

मग ती खेळली आणि बारा वाजता जेवून झोपली. तेव्हा रात्री पावणेतीन पर्यंत मी घरीच थांबलो होतो. तीनच्या दरम्यान निघालो आणि सात वाजता पुण्यात सेटवर पोहोचलो. मला माझ्या बाबांशिवाय आणि मुलांची वेळ अजिबात करमत नाही. आपण स्वतः बाप झाल्याशिवाय कळत नाही असं म्हणतात ते अगदी खरं. हे आपल्याकडून आपोआप होतं. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये संकर्षण कऱ्हाडे ने हा किस्सा सांगितला.

लेकीसाठी बाप काहीही करतो

रात्री साडेअकराला दुकान शोधणं म्हणजे सोपं काम नाही. सगळी दुकानं बंद झालेली असतात. पण लेकीसाठी बाप काहीही करतो. त्याने त्या रात्री दुकान शोधून तिच्यासाठी युनिकॉन घोडा आणला. लहान मुलं खेळण्यात गुंतली की त्यांना तापाचं, त्रासाचं जरा कमी वाटतं, हे त्याला माहिती होतं. आणि झालं पण तसंच. ती खेळली, जेवली आणि 12 वाजता झोपली.

तो पुण्याला निघाला

पण संकर्षण तिथेच थांबला नाही. ती झोपली तरी तो तिच्याजवळच बसून राहिला. डोक्यावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवत राहिला. ताप उतरतोय का, हे बघत राहिला. रात्री पावणेतीन वाजेपर्यंत तो घरीच होता. मग पहाटे 3 वाजता तो पुण्याला निघाला आणि बरोबर सकाळी 7 वाजता सेटवर पोहोचला. म्हणजे रात्रभर जागून, न झोपता तो शूटिंगला पोहोचला.

तो म्हणतो, “मला माझ्या बाबांशिवाय आणि मुलांशिवाय अजिबात करमत नाही.” बाप झाल्यावरच हे कळतं, असं तो सांगतो. आपण लहान असताना आपले वडील आपल्यासाठी किती करतात, हे आपल्याला कळत नाही. पण आपण स्वतः बाप झालो की सगळं आपोआप कळायला लागतं. आपल्याकडून ते आपोआप होतं, असं तो म्हणाला.

संकर्षण लवकरच आदी अनंत या सिनेमात अशोक सराफ आणि सखी गोखले यांच्यासोबत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला. आता येत्या 12 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा थिएटर मध्ये रिलीज होईल.खरं तर हाच खरा बाप असतो. काम कितीही मोठं असलं, शूटिंग कितीही महत्त्वाचं असलं, तरी लेकीचा ताप त्याच्यापेक्षा मोठा असतो. संकर्षणचा हा किस्सा ऐकून बऱ्याच लोकांना आपल्या वडिलांची आठवण आली असेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: संकर्षण कऱ्हाडेच्या मुलीला किती ताप आला होता?

    Ans: संकर्षणच्या मुलीला 102 अंश ताप आला होता.

  • Que: संकर्षण कऱ्हाडेने मुलीच्या आजारपणाचा किस्सा कुठे सांगितला?

    Ans: लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने हा भावुक अनुभव सांगितला.

  • Que: मुलीला ताप असताना संकर्षणला कुठे शूटिंगसाठी जायचे होते?

    Ans: त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता पुण्यात शूटिंगसाठी पोहोचायचे होते.

Web Title: Sankarshan karhade emotional story daughter 102 fever shooting rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 04:39 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • sankarshan karahade

संबंधित बातम्या

New Caller ID Rule: Truecaller ला टक्कर! आता फोनवरच दिसणार अनोळखी कॉल करणाऱ्याचं नाव
1

New Caller ID Rule: Truecaller ला टक्कर! आता फोनवरच दिसणार अनोळखी कॉल करणाऱ्याचं नाव

Nagpur News : शेतकऱ्यांच्या अनुदानावर बँकांचा डोळा नको; मदतीची रक्कम कर्ज खात्यात वळती केल्यास कारवाईचा इशारा
2

Nagpur News : शेतकऱ्यांच्या अनुदानावर बँकांचा डोळा नको; मदतीची रक्कम कर्ज खात्यात वळती केल्यास कारवाईचा इशारा

Smartphone Buying Guide: दिवाळीत नवा फोन घेण्याचा प्लॅन? दुकानातून बाहेर पडण्याआधी ‘या’ 10 गोष्टी तपासा
3

Smartphone Buying Guide: दिवाळीत नवा फोन घेण्याचा प्लॅन? दुकानातून बाहेर पडण्याआधी ‘या’ 10 गोष्टी तपासा

PF खात्यात किती पैसे जमा आहेत? घरबसल्या मोबाईलवर मिळवा एका क्लिकमध्ये माहिती
4

PF खात्यात किती पैसे जमा आहेत? घरबसल्या मोबाईलवर मिळवा एका क्लिकमध्ये माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.