Deepika Padukone and Ranveer Singh welcome baby girl
Deepika Padukone And Ranveer Singh Welcome Baby Girl : अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे ८ सप्टेंबर २०२४ रोजी आई- बाबा झाले. अभिनेत्रीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. दीपिका आणि रणवीरने कन्यारत्न झाल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर करताच त्यांच्या फॅन्सने आणि संपूर्ण बॉलिवूडने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. दीपिका ७ सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी मुंबईतल्या एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाली, त्यानंतर तिने ८ तारखेला एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाला जन्म दिल्यानंतर दीपिकाला आणि तिच्या बाळाला आठवड्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिच्या बाळाला आज अर्थात १५ सप्टेंबरला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. दीपिकाला डिस्चार्ज दिल्यानंतर घरी जात असातनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये मुंबईच्या एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये कारच्या ताफ्यामध्ये चार कार आतमध्ये गेल्या. व्हिडिओमध्ये, दीपिका, रणवीर आणि त्यांची चिमुकली लेक एकाच कारमध्ये तर इतर कारमध्ये दोघांचेही परिवारातील सदस्य वैगेरे होते. व्हिडिओमध्ये, त्यांच्या कारचा ताफा इतक्या वेगाने गेला. त्यामुळे दीपिका आणि रणवीरच्या मुलीच्या चेहऱ्याची झलक मात्र दिसली नाही.
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून ‘विरल भयानी’ ह्या पापाराझीच्या इन्स्टा पेजवरही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यावेळी दीपिका व्हाईट कलरच्या सूटमध्ये दिसत असून, रणवीरने सुद्धा पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केल्याचं दिसतंय. दीपिकाला आणि तिच्या बाळाला भेटण्यासाठी प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी, बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरूख खान सुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता.
दीपिका सध्या मातृत्वाचा आनंद घेत असून सध्या तिच्या चिमुकल्या परीची काळजी घेण्यात व्यग्र आहे. दीपिकाने आई झाल्यानंतर इन्स्टाग्रामवरील बायोमध्ये बदल केला आहे. “Feed, burp, sleep, repeat”. असे चार शब्द तिने तिच्या बायोमध्ये लिहिले आहेत. याचा अर्थ, सध्या ती तिच्या लेकीला खाऊ घालतेय (स्तनपान करतेय), तिला ढेकर काढून झोपवते, सध्या हे चक्र सुरू आहे अशा आशयाची दीपिकाची इंस्टाग्राम बायो आहे.
हे देखील वाचा – रितेश देशमुख देणार आज स्पर्धकांना सरप्राईज! घरातील सदस्य झाले भावुक
दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, दीपिका शेवटची ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तर रणवीर ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर आता लवकरच अभिनेता ‘डॉन ३’ आणि ‘सिंघम अगेन’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, दीपिका पदुकोणने २०१८ मध्ये रणवीर सिंगसोबत लग्न केले होते. ‘गोलियों की रासलीला: रामलीला’ या चित्रपटाच्या सेटवर या दोघांची भेट झाली होती. त्याचवेळी ते एकमेकांच्या प्रेमात पडले. ५ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ‘गोलियों की रासलीला: रामलीला’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’, ’83’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केले. त्यांचे हे चित्रपट सुपरहिट देखील ठरले.