'बिग बॉस मराठी'च्या घरातील आणखी एका सदस्याला मिळणार नारळ; निक्की, वैभव, अभिजीत की वर्षाताई ?
बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू होऊन जवळपास ५० दिवस झाले आहेत. अगदी पहिल्या दिवसापासून शोची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. आजपासून आठव्या एपिसोडला सुरूवात झाली असून घरातील सर्वच स्पर्धकांचा खेळ अधिकच रंजक होताना दिसत आहे. आजच्या ‘भाऊच्या धक्का’वर रितेश थेट बिग बॉसच्याच घरात गेला आहे. रितेश देशमुख आज रविवारच्या भागामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे. मुख्य बाब म्हणजे, या आठवड्यातल्या नॉमिनेट स्पर्धकालाही रितेश बिग बॉसच्याच घरातून निरोप दिला आहे.
हे देखील वाचा – रितेश देशमुख देणार आज स्पर्धकांना सरप्राईज! घरातील सदस्य झाले भावुक
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये रितेश घरात असून तो नॉमिनेट होणाऱ्या स्पर्धकाबद्दल बोलताना दिसत आहे. रितेश म्हणतोय, “आज बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार हे मला जाहीर करायचं आहे. तुमच्यासमोर येऊन हे जाहीर करणं माझ्यासाठी प्रचंड अवघड आहे. देशातील मराठी प्रेक्षकांनी ठरवलंय या आठवड्यात घराबाहेर जाणारा सदस्य ठरवला आहे. त्यामुळे घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव आहे….” रितेश ‘भाऊच्या धक्का’वरुन बाहेर पडणाऱ्या सदस्याचं नाव न जाहीर करता घरात येऊन सदस्यांसमोरच करणार आहे. त्यामुळे आजच्या भागात एक वेगळा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
या आठवड्यात अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर, वैभव चव्हाण आणि आर्या जाधव हे सदस्य नॉमिनेट झाले होते. कालच्या एपिसोडमध्ये (शनिवार) आर्याने कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्कीच्या कानशिलात मारल्यामुळे तिला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले आहेत. त्यामुळे आता अभिजीत, वर्षा, निक्की, अंकिता आणि वैभव यांच्यापैकी कोणाला घरचा आहेर मिळणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. रितेश ‘भाऊच्या धक्का’वरुन नॉमिनेट स्पर्धकाचं नाव न जाहीर करता घरात येऊन सदस्यांसमोर नाव जाहीर करत असल्यामुळे आजच्या एपिसोडमध्ये वेगळा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे..
हे देखील वाचा – भुषण प्रधान दिसणार नव्या भूमिकेत, ‘पुन्हा एकदा चौरंग’मध्ये उकलणार ‘त्या’ हत्येचं गुढ
रितेश देशमुखने घरामधील सदस्यांच्या घरी व्हिडीओ कॉल करून त्यांना फॅमिलीसोबत बोलण्याची संधी दिली आहे. यावेळी जान्हवीचा मुलगा तिच्यासोबत व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसणार आहे. यावेळी, पॅडीच्या डोळ्यामध्येही अश्रू पाहायला मिळाले. बिग बॉसच्या घरामधील सर्व सदस्य हे भावुक होताना दिसले. त्यामुळे आज भावुक सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. पुरुषोत्तमदादा पाटील, निखिल दामले, योगिता चव्हाण, इरिना, आणि घन:श्याम दरवडे या स्पर्धकांनी आतापर्यंत या घराचा निरोप घेतला. उरलेल्या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. तर काल आर्यालाही बिग बॉसच्या घरातून काढण्यात आले आहे.