लक्ष्मी आली हो ! आई झाल्यानंतर दीपिका पादुकोणची पहिली पोस्ट, बॉलिवूड सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव
Ranveer – Deepika Drop First Post after Welcoming Baby Girl : अखेर तो क्षण आला…. गेल्या अनेक दिवसांपासून रणवीर- दीपिकाचे चाहते ‘गुड न्यूज’ ऐकण्यासाठी सरसावले होते. अखेर आज म्हणजेच, गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दीपिकाने चाहत्यांना गोड बातमी दिलेली आहे. दीपिकाने मुंबईच्या एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. जन्म दिल्यानंतर अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केलेली आहे.
हे देखील वाचा – ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेत्याचे निधन, विकास सेठीचा ४८ व्या वर्षी मृत्यू
दीपिका पादुकोणने ( Deepika Padukone) कोणतंही कॅप्शन न देता फोटो शेअर केला आहे. दीपिकाने, “वेलकम बेबी गर्ल… ८-९-२०२४… दीपिका अँड रणवीर”, असं या फोटोला कॅप्शन देत तिने शेअर केलेला आहे. एक रिबीनची डिझाईन दिसत आहे. त्या डिझाईनमध्ये अभिनेत्रीने कॅप्शन लिहिलेय. दीपिका आणि रणवीरने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून आणि बॉलिवूड सेलिब्रिटींकडून लाईक्सचा वर्षाव केला जात असून कमेंट करत अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत.
दीपिकाच्या या पोस्टवर अभिनेत्री आलिया भट्ट, क्रिती सेनॉन, शर्वरी वाघ, पूजा हेगडे, अर्जुन कपूर, सुनील ग्रोव्हर, श्रद्धा कपूर, हरभजन सिंग, गोहर खान, रश्मी देसाई, प्रियंका चोप्रा, अमृता खानविलकर, सिद्धार्थ जाधव, मलायका अरोरा, सोनाक्षी सिन्हा, अनन्या पांडेसह अशा अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया देत दीपिका आणि रणवीरला शुभेच्छा देत आहेत.
दीपिका आणि रणवीरने गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीच प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरात जाऊन खास होणाऱ्या बाळासाठी आशीर्वाद घेतला होता. त्याच्या काही दिवसच आधी दीपिका आणि रणवीरने मॅटर्निटी फोटोशूट केले होते.