सौजन्य - सोशल मीडिया
Bigg Boss Marathi 1st Wild Card Entry : बिग बॉसच्या सहाव्या आठवड्यातल्या ‘भाऊच्या धक्का’वर रितेशने अनेक स्पर्धकांची खरडपट्टी काढली आहे. जरीही सहावा आठवडा अगदी खूप चांगल्या पद्धतीने गेला असला तरी रितेशने धक्क्यावर अरबाज पटेल आणि निक्की तांबोळीची विशेष कानउघडणी केली आहे. जान्हवी किल्लेकरला बिग बॉसने जेलमध्ये टाकलं होतं. आता त्यानंतर निक्कीलाही बिग बॉसने वर्तणुकीवरून आणि नियमभंग केल्यामुळे दोन मोठ्या शिक्षा दिल्या आहेत. मुख्य बाब म्हणजे, निक्की संपूर्ण सीझन घराची कॅप्टन होऊ शकणार नाही, त्यासोबतच तिला या आठवड्यात भांडी घासण्याचे काम दिले आहे. जर तिने ते काम केले नाही तर, तिला घरातून नॉमिनेट करण्यात येईल.
एकीकडे घरातून अनेक स्पर्धक घराबाहेर जात असताना आता अशातच बिग बॉसच्या घरात पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. ऐन गणपतीमध्येच ही एन्ट्री होत असून याचा आता पहिला प्रोमो पहिला समोर आला आहे. मुख्य बाब म्हणजे, अरबाजला आणि वैभवला टफ देणारा हा स्पर्धक असल्याचं बोललं जात आहे. हा रांगडा गडी असून प्रोमो असून त्याच्या शरीरयष्टीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. खरंतर दुसऱ्या आठवड्यापासूनच बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक येणार अशी चर्चा सुरू होती. पण तसं काही झालं नाही. बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून कोण एन्ट्री घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
शेअर केलेल्या प्रोमोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धकाच्या एन्ट्रीची झलक दाखवण्यात आली आहे. “तो आहे मर्द रांगडा आणि मनाचा राजा… अस्सल फौलाद घालणार बिग बॉसच्या घरात राडा…” अशी ओळख वाइल्ड कार्ड स्पर्धकाची करून देण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्डच्या रुपात कोल्हापुरचा संग्राम चौगुले एन्ट्री करणार अशी चर्चा सुरू आहे. पुरुषोत्तम दादा पाटील, निखिल दामले, योगिता चव्हाण, इरिना रुडाकोव्हा, घनश्याम दरवडे असे एकूण पाच स्पर्धक आजपर्यंत बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट झालेले आहेत.
हे देखील वाचा – सलमान खान आणि भाचीच खास नातं! अर्पिता खानच्या मुलीसोबत केली गणरायाची आरती