फोटो सौजन्य - सोशल मीडिया
Vikas Sethi Passed Away : हिंदी टेलिव्हिजनसृष्टीतून दु:खद बातमी समोर येत आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या एकता कपूरच्या टिव्ही सिरियलच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या अभिनेत्याचे निधन झाले आहे. अभिनेता विकास सेठीचे वयाच्या ४८ व्या वर्षी निधन झाले आहे. अभिनेत्याच्या निधनाचे वृत्त ऐकून चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून अचानक अभिनेत्याचे निधन झालेले आहे.
८ सप्टेंबर रोजी रविवारी झोपेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्यासोबतच अभिनेता आर्थिक अडचणीमध्ये होता. अभिनेता विकास सेठीच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला आहे. विकास सकाळी झोपेतून नं उठल्याने पत्नीने घाईघाईने त्याला रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक संकटातून जात होता. त्याला बरेच दिवस काम मिळत नव्हते. इंडस्ट्रीतील अनेक मित्रांच्या संपर्कातही तो नव्हता. टेलिव्हिजन शो व्यतिरिक्त विकासने करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातही रॉबीची भूमिका साकारली होती. त्याला या चित्रपटातूनही चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.
विकास सेठीच्या कुटुंबियांनी अद्याप अभिनेत्याच्या निधनावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कहीं तो होगा’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ या तीन मालिकेंसोबतच विकास सेठीने इतर अनेक मालिकांमध्ये छोटे छोटे पात्र साकारले होते. नच बलीये या डान्सिंग रिॲलिटी शोच्या तिसऱ्या पर्वात त्याने आपल्या पत्नीसह सहभाग घेतला होता. ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक विकास सेठी आहे.