(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
साउथचा सुपरस्टार प्रभास सध्या त्याच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘कल्की 2898 एडी 2’ मुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटासंदर्भात एकामागून एक मोठ्या बातम्या समोर येत आहेत.काही दिवसांपूर्वी अशी माहिती आली होती की, दीपिका पादुकोणला या चित्रपटातून बाहेर करण्यात आलं आहे. कल्की २८९८ एडी’ या चित्रपटांतील एक्झिटमुळे दीपिका चांगलीच चर्चेत आहे. दिवसाला फक्त ८ तास काम करण्याची मागणी त्यावेळी अभिनेत्रीने केली होती, ज्यानंतर अनेकांनी त्यांच्या याबद्दलच्या विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
अशातच आता ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाच्या सिक्वलबद्दल एक अपडेट समोर आली आहे. दीपिका नंतर या चित्रपटात आता नवीन अभिनेत्री कोण असणार? या चर्चेला जोरदार उधाण आलं आहे. लेट्स सिनेमा च्या रिपोर्टनुसार, दीपिका पदुकोणच्या एक्झिटनंतर आलिया भट्ट हिला ‘कल्की 2898 AD 2’ मध्ये लीड फीमेल रोलसाठी कास्ट करण्याची शक्यता आहे.ही बातमी समोर आल्यानंतर आलियाच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. मात्र, सध्या आलिया तिच्या इतर काही प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. त्यामुळे ती या चित्रपटाचा भाग बनणार की नाही, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.महत्त्वाचं म्हणजे, निर्मात्यांनी अजूनपर्यंत यावर कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
Amitabh Bachchan यांनी 83 व्या वाढदिवशी स्वतःलाच दिले करोडो रुपयांचे गिफ्ट, पहाल तर डोळे विस्फारतील
दीपिका पदुकोणने अलीकडेच संदीप रेड्डी वांगा यांच्या बहुचर्चित चित्रपट ‘स्पिरीट’ मधून माघार घेतली होती. तिच्या जागी दिग्दर्शकाने तृप्ती डिमरी हिला कास्ट केलं असून, त्यांनी याबद्दल स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. आता अशाचप्रकारे, दीपिकाने आणखी एका मोठ्या प्रोजेक्टमधून, म्हणजेच नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की २८९८ एडी’ च्या सिक्वलमधूनही एक्झिट घेतल्यानंतर तिच्या जागी दुसऱ्या बॉलीवूड अभिनेत्रीची निवड करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
ऋतिक रोशन OTT वर धुमाकूळ घालणार! प्राइम व्हिडिओसोबत ‘स्टॉर्म’ वेब सिरीजची घोषणा
या चित्रपटासंदर्भात अभिनेत्री आलियाबरोबर मेकर्सची बोलणी सुरू आहेत. परंतु, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीय. अलीकडेच चित्रपटाच्या मेकर्सने दीपिका पादुकोण या चित्रपटाच्या सिक्वलचा भाग नसल्याची अधिकृत माहिती दिली होती. यामुळे आता प्रभासबरोबर आलिया भट्ट झळकणार असल्याची शक्यता आहे.