सैफ अली खानने नेते राहुल गांधीचं केलं कौतुक, उधळली स्तुती सुमनं; म्हणाला, "प्रभावशाली आणि धाडसी नेता..."
कोरटाला शिवा दिग्दर्शित ‘देवरा’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. हा चित्रपट आज अर्थात २७ सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी धमाकेदार कमाई करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. चित्रपटाची टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून वेगवेगळ्या ठिकाणी ही टीम सध्या मुलाखती देत आहेत. नुकतंच चित्रपटाच्या टीमने ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’ या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमा दरम्यान एकंदरितच अभिनेत्याने वेगवेगळ्या पैलूंवर भाष्य केले. यावेळी भारताच्या राजकारणासंबंधितही थोडक्यात भाष्य केलं.
‘देवरा’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, सैफ अली खानला सध्याच्या देशातला राजकारणातील प्रभावी नेता कोण ? जो भविष्यात देशाला पुढे नेऊ शकतो ? असा त्याला प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी अभिनेत्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल असे पर्याय देण्यात आले होते. असा प्रश्न विचारताच अभिनेत्याने खासदार राहुल गांधी यांचं नाव घेतलं. यावेळी त्याने राहुल गांधी याचं मोठ्या प्रमाणावर कौतुक केले आहे. अभिनेत्याने मुलाखतीमध्ये म्हटलं की, “मला धाडसी आणि इमानदार नेते मंडळी आवडतात. पण देशातील सगळेच नेते धाडसी आणि इमानदार नेते आहेत. जर कोणत्या एका राजकीय नेत्याचं नाव घ्यायचं असेल तर, मी राहुल गांधी यांचं नाव घेतो. ते खरोखर देशातील प्रभावशील नेत्यांपैकी एक आहे.”
“What kind of Politician do you like?”
Saif Ali Khan: “I like a Brave Politician, an Honest Politician. I think what Rahul Gandhi has done is very impressive.” 🔥🔥 pic.twitter.com/ZQLHwdzhy8
— Ayush Saxena (@Witty_Ayush) September 26, 2024
“त्यांनी आजपर्यंत देशासाठी खूप चांगले कामं केली आहेत. एक काळ असा होता की, त्यांच्या बोलण्यावर आणि त्यांनी केलेल्या कामांवर लोकं टीका करायचे. मला असं वाटतं की, स्वत: राहुल यांनी अनेक कठोर परिश्रम घेत देशाची परिस्थिती बदलली आहे.” शिवाय अभिनेत्याने पुढे राजकारणात प्रवेश करणार का? या प्रश्नावर भाष्य केले. अभिनेता म्हणतो, “मला राजकारणात आवड नाही. जर मला स्वत:चे मत मांडायचे असेल तर, मी नक्की राजकारणात येण्याचा विचार करेन.” ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खान व्यतिरिक्त प्रकाश राज, मिका श्रीकांत, शाइन टॉम चाको, चैत्रा रॉय आणि श्रुती मराठे या कलाकारांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
हे देखील वाचा- प्रिया बापट ‘बिग बॉस मराठी’मध्ये गेली तर ? अभिनेत्रीने स्वत: दिली प्रतिक्रिया