फोटो सौजन्य - सोशल मीडिया
सध्या अभिनेत्री प्रिया बापट कमालीची चर्चेत आहे. मराठी नाटक आणि बॉलिवूड चित्रपट- सीरिजमुळे सध्या ती चर्चेत आहे. मराठी आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या प्रियाचा गेल्या काही दिवसांपूर्वी ‘रात जवाँ है’चा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला. सीरीजचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच अभिनेत्री चर्चेत आहे. सध्या प्रिया सीरीजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रमोशन दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने ‘बिग बॉस मराठी’वर आपलं मत मांडलं आहे. तिला बिग बॉस शो आवडतो का? तिचा आवडता स्पर्धक कोण ? शिवाय जर ती भविष्यात शोमध्ये गेली तर ? एकंदरित अशा अनेक प्रश्नांवर तिने दिलखुलास बातचीत केली आहे.
नुकतंच प्रिया बापटने ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली की, “आमच्या घरी केव्हा तरी ‘बिग बॉस’ पाहिलं जातं आणि मी सुद्धा केव्हातरी ‘बिग बॉस’शो फॉलो करते. ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आजवर जितका पाहिला आहे, तितक्यात अभिजीत, पॅडी दादा आणि अंकिता हे तिनही स्पर्धक आपल्या मराठी संस्कृतीला आणि आपल्या खऱ्या स्वभावालाच जपून ते खेळतात. ते धज्जिया उडवत नाहीत. निक्की तांबोळी आधीच हिंदी बिग बॉस खेळून आली आहे, त्यामुळेच ती असं खेळतेय. कदाचित ती बरोबरही खेळत असेल, कारण मला फारसा खेळ कळत नाही. समजा मी सुद्धा बिग बॉसच्या घरात गेलेच तर मी सुद्धा योगिता सारखंच म्हणेन की, “बाबा, मला इथून काढा…” ”
हे देखील वाचा- रुह बाबाला हरवायला सज्ज झाली ‘मंजुलिका’, दिवाळीला होणार ‘भूल भुलैया 3’चा धमाका!
अभिनेत्रीच्या मुलाखतीची सध्या जोरदार चर्चा होत असून चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. ‘रात जवां है’ सीरीजच्या ट्रेलरमधून उत्तम कथानकाची लक्षवेधक झलक देखील पाहायला मिळत आहे. राधिका (अंजली आनंद), अविनाश (बरूण सोबती) आणि सुमन (प्रिया बापट) या तीन जिवलग मित्रांभोवती सीरीजचे कथानक फिरताना दिसत आहे. यामिनी पिक्चर्स प्रा. लि. द्वारे निर्मित सिरीज ‘राज जवां है’चे लेखन आणि निर्मिती ख्याती आनंद – पुथरन यांनी केले आहे. आणि अत्यंत प्रतिभावान सुमीत व्यास यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच या सिरीजचे निर्माते विकी विजय आहेत. या कॉमेडी-ड्रामामध्ये प्रतिभावान स्टार कलाकार आहेत.
‘रात जवां है’ पाहण्यास पर्वणी अशी सिरीज आहे, ज्यामध्ये हसवून-हसवून लोटपोट करणारे क्षण, हृदयस्पर्शी सीनचा समावेश करण्यात आला आहे. याचदरम्यान, ‘रात जवां है’सह पालकत्वाचा रोमांचक प्रवास पाहण्यासाठी सज्ज राहा आणि सिरीज ११ ऑक्टोबरपासून सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.