(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे सध्या चित्रपटसृष्टीपासून थोडेसे दूर असले तरी सोशल मीडियावर मात्र ते सक्रिय असून, आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अनेकदा ते त्यांच्या आरोग्याशी संबंधित पोस्ट्स शेअर करतात, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना काळजी वाटते.
धर्मेंद्र त्यांच्या करिअरइतकेच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चत राहिले आहेत. धर्मेंद्र हेमा मालिनींच्या प्रेमात पडले आणि ४ अपत्ये असूनही त्यांनी लग्न केलं. याचा धक्का त्यांच्या पत्नी प्रकाश कौर यांना पचवावा लागला.
आता धर्मेंद्र यांचे सुपुत्र आणि अभिनेता बॉबी देओलने एका मुलाखतीमध्ये एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, ”वडील सध्या आई प्रकाश कौर यांच्यासोबत खंडाळा येथील आमच्या फार्महाउसवर राहत आहेत. ते तिथे शांततेत आणि समाधानी आयुष्य जगत आहेत. पप्पा आणि मम्मी एकत्र आहेत. पप्पा कधी कधी थोडे ड्रामा करतात. त्यांना फार्महाऊसमध्ये राहायला आवडतं. आता त्यांचं वय झालंय, त्यामुळे फार्महाऊसमध्ये राहणं त्यांच्यासाठी आरामदायी आहे. तिथलं हवामान छान आहे, जेवण छान आहे.”
जागतिक कन्या दिनानिमित्त ‘आशा’ चित्रपटाची भव्य स्क्रीनिंग; डॉ. श्रीकांत शिंदे यांची खास उपस्थिती!
पुढे बॉबी देओल त्याची आई प्रकाश कौर यांच्या बद्दल म्हणाला, “माझ्या आईबद्दल तुम्हाला फारसं ऐकायला मिळत नाही कारण लोक सहसा आम्हाला तिच्याबद्दल विचारत नाहीत. आणि माझा भाऊ आणि वडील अभिनेते असल्याने, मी त्यांच्याबद्दल जास्त बोलतो. माझी आई गृहिणी आहे आणि मी तिचा लाडका आहे. आम्ही दररोज बोलतो. मी आज जे आहे ते माझ्या पत्नीमुळे आहे आणि माझ्या वडिलांचंही असंच आहे. माझ्या आईच्या पाठिंब्यामुळेच माझे वडील मोठे स्टार बनले”
पंजाबहून मुंबईत कामाच्या शोधात आलेले धर्मेंद्र हे तेव्हा आधीच विवाहबद्ध होते. नंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये सुपरस्टार म्हणून ओळख मिळवली आणि हेमा मालिनी यांच्याशी दुसरे लग्न केले. मात्र, आजही ते त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांच्याशी संपर्कात असून त्यांच्यासोबत राहत असल्याची माहिती बॉबीने दिली.धर्मेंद्र यांच्या या वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते आणि त्यांचे सोशल मीडिया पोस्ट्स नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. बॉबी देओलच्या या वक्तव्यानंतर धर्मेंद्र यांचे कुटुंबिक नातेसंबंध आणि त्यांच्या सध्या चालू असलेल्या आयुष्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.