(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला एका धमाल प्रेमकथेसह येणार आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘दे दे प्यार दे 2’ १४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
हा चित्रपट एका एज-गॅप असलेल्या कपलच्या लव स्टोरीवर आधारित असून, यामध्ये पुन्हा एकदा अजय देवगणसोबत रकुल प्रीत सिंह लीड भूमिकेत दिसणार आहे.अभिनेता अजय देवगणने आपल्या इन्स्टाग्रामवर आगामी चित्रपट ‘दे दे प्यार दे 2’ चं मजेशीर मोशन पोस्टर शेअर केलं.या पोस्टरमध्ये एक धमाल प्रसंग दाखवण्यात आला आहे. रकुल प्रीत सिंहच्या कुटुंबीयांनी अजय देवगणला कारमधून बाहेर फेकताना दाखवण्यात आलं आहे! या सीनमध्येच चित्रपटातल्या प्रेमकथेच्या जोडीला होणाऱ्या कौटुंबिक हंगामाची झलक दिसते.
जागतिक कन्या दिनानिमित्त ‘आशा’ चित्रपटाची भव्य स्क्रीनिंग; डॉ. श्रीकांत शिंदे यांची खास उपस्थिती!
‘दे दे प्यार दे’चा पहिला भाग २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आता त्याचा हा दुसरा भाग प्रेक्षकांसाठी आणखी मजेदार ठरण्याची शक्यता आहे. अजय देवगण, रकुल प्रीत सिंह आणि आता आर. माधवन या तगड्या स्टारकास्टसोबत ‘दे दे प्यार दे 2’ हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.चित्रपटात यावेळी तब्बू दिसणार नसली तरी, अनेक नवीन चेहरे झळकणार आहेत. मीजान जाफरी, गौतमी कपूर, इशिता दत्ता, जावेद जाफरी, जिमी शेरगिल, आलोक नाथ आणि कुमुद मिश्रा.चित्रपटाचे दिग्दर्शन अंशुल शर्मा यांनी केले असून, भूषण कुमार, कृष्ण कुमार, लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
‘झी मराठी अवॉर्ड्स 2025’ ला भावनांचा महाउत्सव; लाडक्या जोड्यांचे मनमोहक परफॉर्मन्स!
‘दे दे प्यार दे’ या २०१९ साली आलेल्या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचं दिग्दर्शन अकिव अली यांनी केलं होतं, तर त्याची कथा लव रंजन यांनी लिहिली होती. ते या चित्रपटाचे सह-निर्माते देखील होते. चित्रपटात अजय देवगण, रकुल प्रीत सिंह यांच्यासोबत तब्बू यांचीही एक महत्त्वपूर्ण भूमिका होती. यामध्ये जावेद जाफरी यांनी देखील काम केलं होतं.आता येणाऱ्या सीक्वल अर्थात ‘दे दे प्यार दे 2’ मध्ये जावेद जाफरींचे चिरंजीव मीजान जाफरी झळकणार आहेत, जे यावेळी मोठ्या भूमिकेत दिसतील.‘दे दे प्यार दे’ या चित्रपट ७५ कोटी रूपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. या चित्रपटाने भारतात १०४ कोटी रुपये कमावले होते तर जगभरात एकूण १४३ कोटी रुपयांची कमाई केली होती.