Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“झुकेगा नहीं साला…” कॉन्सर्टसाठी महाराष्ट्र सरकारने सल्लागार समिती नेमल्याने दिलजीत दोसांझची नाराजी

गायक- सुपरस्टार दिलजीत दोसांझ 'दिल लुमिनाटी' टूर शोमुळे चर्चेत आहे. नुकताच त्याचा मुंबईत कॉन्सर्ट झाला. त्याच्या कॉन्सर्टआधी महाराष्ट्र सरकारने त्याच्या शोसाठी सल्लागार समिती नेमल्यामुळे गायकाने नाराजी व्यक्त केलीये.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 20, 2024 | 05:16 PM
फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वी भजन-कीर्तन गायचा, शाहिद कपूरच्या 'या' चित्रपटाने दिली दिलजीत दोसांझच्या करिअरला कलाटणी!

फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वी भजन-कीर्तन गायचा, शाहिद कपूरच्या 'या' चित्रपटाने दिली दिलजीत दोसांझच्या करिअरला कलाटणी!

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून गायक आणि सुपरस्टार दिलजीत दोसांझ त्याच्या ‘दिल लुमिनाटी’ या टूर शोमुळे चांगलाच चर्चेत आहे. दिलजीत त्याच्या म्युझिकल टूरसाठी देशातल्या महत्वाच्या शहरांमध्ये फिरत आहे. यानिमित्त त्याचे भारतात अनेक ठिकाणी कॉन्सर्ट आयोजित करत आहे. काहीच दिवसांपूर्वी या म्यूझिक कॉन्सर्टसाठी दिलजीत पुण्याला येऊन गेला. त्यानंतर आता नुकताच त्याचा मुंबईत कॉन्सर्ट झाला. त्याच्या कॉन्सर्टआधी महाराष्ट्र सरकारने दिलजीतच्या शोसाठी सल्लागार समिती नेमल्यामुळे गायकाने नाराजी व्यक्त केली आहे.

‘साती साती पन्नास’ नाटकाचे नव्याने प्रयोग रंगणार, नवोदित कलाकारांना मिळणार संधी; पहिला प्रयोग केव्हा?

दिलजीत दोसांझचा १९ डिसेंबरला मुंबईमध्ये कॉन्सर्ट होता. दिलजीतचा कॉन्सर्ट दरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये, तो त्याच्या कॉन्सर्टसाठी जारी केलेल्या ॲडव्हायझरीबद्दल बोलताना दिसत आहे. यावेळी गायकाने ‘पुष्पा’ स्टाईलमध्ये मी झुकणार नाही, असं त्याने सांगितलंय. टीम दिलजीत ग्लोबल नावाच्या फॅन्स पेजने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओमध्ये दिलजीत म्हणतो, “काल मी माझ्या टीमला विचारलं तर, माझ्या शोसाठी कोणतीही ॲडव्हायझरी टीम नव्हती. त्यांनी मला सर्व व्यवस्थित असल्याचं सांगितलं. पण आज सकाळी कळलं की, महाराष्ट्र सरकारने माझ्या विरोधात ॲडव्हायझरी टीमची नेमणूक केली होती. पण तुम्ही काळजी करू नका. माझ्या कॉन्सर्टमध्ये तुम्ही जितकी मजा मस्ती करण्यासाठी आले होते, त्याच्यापेक्षा दुप्पटीने मी तुम्हाला आनंद देईल.”

 

व्हिडिओमध्ये दिलजीत पुढे म्हणाला की, “आज सकाळी मी जेव्हा योगा करत होतो, त्या दरम्यान माझ्या डोक्यात खूप चांगला विचार आला. आजच्या शोची सुरुवात मी त्याच विचाराने करणार आहे. जेव्हा सागर मंथन झालं होतं, तेव्हा अमृत होतं ते देवतांनी प्यायलं होतं. परंतु जे विष होतं ते भगवान शंकरांनी प्राशन केलं होतं. भोलेनाथने ते विष आपल्या आत घेऊन कंठात ठेवलं. म्हणून त्यांना नीलकंठ म्हणतात. मला यावरुन हेच शिकायला मिळालं की, आयुष्य असो किंवा आसपासचं जग तुमच्यावर कितीही विष फेकत असतील तरीही ते विष तुम्ही तुमच्या आत किती घेताय, हे तुमच्यावर अवलंबून आहे. मी यातून हेच शिकलो.”

“गाडगेबाबांबद्दल वाचलं की मला…”, अभिनेता किरण मानेनी शेअर केली संत गाडगे महाराजांबद्दल खास पोस्ट

“तुम्ही तुमच्या कामात केव्हाही कमी पडू नका. लोकं तुम्हाला अडवतील, रोखतील पण तुम्हाला जे वाटेल ते करा. माझ्या कॉन्सर्टमध्ये तुम्ही आज जेवढी मजा मस्ती करण्यासाठी आले होते, त्याच्यापेक्षा दुप्पटीने मी धम्माल मस्ती मी तुम्हाला देईल. मजा करा. कारण आज मी झुकणार नाहीये.” अशाप्रकारे दिलजीतने व्हिडिओमध्ये त्याची नाराजी व्यक्त केलीये.

Web Title: Diljit dosanjh took a dig on advisory for mumbai concert in pushpa style says aaj jhukega nahi dil luminati india tour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2024 | 05:16 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Diljit Dosanjh
  • Diljit Dosanjh Concert

संबंधित बातम्या

Border 2 Star Cast Fees: स्टार कास्टच्या कमाईत सनी देओल अव्वल; वरुण धवनसह इतर कलाकारांची फी किती? जाणून घ्या
1

Border 2 Star Cast Fees: स्टार कास्टच्या कमाईत सनी देओल अव्वल; वरुण धवनसह इतर कलाकारांची फी किती? जाणून घ्या

संजय दत्तने सांगितल्या जेलमधील आठवणी; म्हणाला, “असं अन्न मिळायचं की..”
2

संजय दत्तने सांगितल्या जेलमधील आठवणी; म्हणाला, “असं अन्न मिळायचं की..”

Jay Bhanushali आणि Mahhi Vij यांचा घटस्फोट; लग्नाच्या 14 वर्षांनंतर नात्याला पूर्णविराम, अभिनेत्याने पोस्ट करत सांगितलं सत्य
3

Jay Bhanushali आणि Mahhi Vij यांचा घटस्फोट; लग्नाच्या 14 वर्षांनंतर नात्याला पूर्णविराम, अभिनेत्याने पोस्ट करत सांगितलं सत्य

Hema Malini कशामुळे ठरल्या ‘ड्रीमगर्ल’? या टायटलमागचं सत्य काय? जाणून घ्या संपूर्ण गोष्ट
4

Hema Malini कशामुळे ठरल्या ‘ड्रीमगर्ल’? या टायटलमागचं सत्य काय? जाणून घ्या संपूर्ण गोष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.