Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुजय डहाकेच्या ‘तुझ्या आयला’चे पोस्टर इफ्फीमध्ये लाँच

गोव्यातील प्रतिष्ठित इफ्फी फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'तुझ्या आयला'च्या बहुप्रतिक्षित पोस्टरचे नुकतेच अनावरण करण्यात आले. ज्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 25, 2024 | 03:59 PM
सुजय डहाकेच्या 'तुझ्या आयला'चे पोस्टर इफ्फीमध्ये लाँच

सुजय डहाकेच्या 'तुझ्या आयला'चे पोस्टर इफ्फीमध्ये लाँच

Follow Us
Close
Follow Us:

मराठी सिनेमाच्या कक्षा सातत्याने रुंदावत आहेत आणि सुजय एस. डहाकेचा नवीन चित्रपट ‘तुझ्या आयला’ त्याला अपवाद नाही. ‘शाळा’, ‘फुंतरू’ आणि ‘श्यामची आई’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याच्या धाडसी कथाकथनासाठी ओळखला जाणाऱ्या सुजयने शाब्दिक शिवीगाळ आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम या सशक्त विषयासह पुन्हा एकदा एक धाडसी झेप घेतली आहे. गोव्यातील प्रतिष्ठित अशा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) मध्ये ‘तुझ्या आयला’च्या बहुप्रतिक्षित पोस्टरचे नुकतेच अनावरण करण्यात आले, ज्यामुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणि उत्साह अधिक वाढला आहे.

“सर्वांनाच माहितीये…”, रश्मिका मंदनाने विजय देवरकोंडासोबतच्या रिलेशनवर केले भाष्य; अभिनेत्रीने मॅरेज प्लॅनही केला शेअर

सुनील जैन, प्रकाश फिल्म्स, प्रशांत बेहेरा आणि वन स्टॉप मीडिया प्रस्तुत ‘तुझ्या आयला’ची निर्मिती पुणे फिल्म कंपनी आणि कल्ट डिजिटलच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. सुनील जैन, आदित्य जोशी, सुजय डहाके, अश्विनी परांजपे या चित्रपटाचे निर्माते असून मेघना प्रामाणिक, देबाशीष प्रामाणिक, राजेश सिंग आणि अंकित चंदिरामाणी सहनिर्माते आहेत. ‘शिवी नाय खेळाचं नाव हाय ते’, ही टॅगलाइन चित्रपटाच्या मध्यवर्ती कल्पनेचे भाषांतर करण्यासाठी पुरेशी आहे. शाब्दिक शिवीगाळ हा खेळ नाही – ही एक मोठी परिणामाची बाब आहे. चित्रपटाची कथा मुलांच्या भावनिक जीवनाभोवती फिरते आणि त्यांच्या तोंडी येणारी शिवीगाळ खेळकर पद्धतीने तसेच खेळीमेळीच्या वातावरणात सादर करण्यात आली आहे. ही थीम विशेषत: आजच्या जगाला साजेशी आहे, जिथे ऑनलाइन ट्रोलिंगने शाब्दिक हिंसेला चिंताजनक पातळीवर नेले आहे. शब्द शारिरीक आघातांइतकेच खोलवर जखमा करू शकतात आणि आपण किती अनौपचारिकपणे अशी भाषा वापरतो जिच्या जखमा मनावर चिरकाल राहतात हे चित्रपटाद्वारे सांगण्याचे खरे आव्हान होते.

 

दिग्दर्शक सुजय डहाके याबाबत स्पष्ट करतात की, “शाब्दिक गैरवर्तनाने मला नेहमीच भुरळ घातली आहे आणि त्रास दिला आहे. आज हे आपल्या संस्कृतीत सामान्य झाले आहे, तरीही त्याचा प्रभाव खोलवर आहे. विशेषत: ते शब्द जेव्हा आपल्यासाठी प्रेम आणि आदराची मूर्ती असलेल्या आईबद्दल वापरले जातात, तेव्हा अशा भाषेच्या मुळांवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. या चित्रपटाद्वारे, मला शब्दांची शक्ती आणि त्यांच्यामुळे होणारे नुकसान यावर ऑफलाइन आणि डिजिटल दोन्ही ठिकाणी चर्चा सुरू करायची आहे.” फेस्टिव्हल विश्वात आधीच आपला ठसा उमटवल्यानंतर या चित्रपटाला लक्षणीय ओळख मिळाली आहे. भारतीय पॅनोरामाच्या निवडीत त्याचा समावेश करण्यात आला आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाने विशेष ज्युरी पुरस्कार जिंकला आहे. याव्यतिरिक्त, चित्रपटाने तांत्रिक चमक आणि भावनिक अनुनाद अधोरेखित करत सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी आणि ऑडियन्स चॉईस अवॉर्डसाठी प्रशंसा मिळविली आहे.

वरूण धवनचा ‘बेबी जॉन’ आहे 8 वर्ष जुन्या Theri चा रिमेक, कथेपासून ट्रेलरपर्यंत सर्वकाही

राजश्री देशपांडे, रोहिणी हट्टंगडी, संभाजी भगत आणि आश्वासक बालकलाकारांचा समूह असलेल्या प्रतिभावान कलाकारांसह, ‘तुझ्या आयला’ हा एक सिनेमॅटिक अनुभव देणारा सिनेमा जसा विचार करायला लावणारा आहे तसाच तो दृश्यास्पदही आहे. ‘तुझ्या आयला’ हा केवळ एक चित्रपट नसून, हे एक सामाजिक विधान आहे, जे आपण ज्या पद्धतीने संवाद साधतो आणि आपल्या शब्दांमुळे होणारी अनपेक्षित हानी यावर पुनर्विचार करण्याची विनंती करतो. खेळाच्या मैदानात आणि ऑनलाइन दोन्ही ठिकाणी शाब्दिक हिंसेकडे लक्ष वेधून, हा चित्रपट एक दयाळू, अधिक सहानुभूतीशील समाज घडवण्यासाठी आपण सर्वजण पार पाडत असलेल्या जबाबदारीची एक सशक्त आठवण करून देण्याचे काम करणारा आहे.

Web Title: Director sujay dahake tuzy aayla marathi movie poster released on goa international film festival of india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2024 | 03:59 PM

Topics:  

  • marathi film

संबंधित बातम्या

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा
1

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!
2

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन, मोठमोठ्या तारकांची लागणार हजेरी!
3

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन, मोठमोठ्या तारकांची लागणार हजेरी!

साई बाबांचं दर्शन घेत ‘येरे येरे पैसा ३’च्या टीमने ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाणं केलं प्रदर्शित
4

साई बाबांचं दर्शन घेत ‘येरे येरे पैसा ३’च्या टीमने ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाणं केलं प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.