रश्मिका मंदान्नाचा बॉयफ्रेंड कोण? अभिनेत्रीने बोलता बोलता 'या' खास गोष्टी सांगूनच टाकल्या...
‘नॅशनल क्रश’ आणि ‘श्रीवल्ली’ अशा नावांनी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ‘पुष्पा २’ मुळे सध्या चर्चेत आहे. शिवाय अभिनेत्री सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून रश्मिकाचा आणि विजयचा लंच डेटचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोमध्ये दोघेही एकत्र लंच करताना दिसत आहे. यापूर्वीही अनेकदा रश्मिकाचं नाव दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाशी जोडलं गेलंय. मात्र त्यावर दोघांनीही कधी प्रतिक्रिया दिली नाही. काही दिवसांपूर्वी विजयने रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर आता रश्मिकाने वेडिंग प्लॅन्सवर भाष्य केलं आहे. रविवारी रश्मिका चेन्नईमध्ये ‘पुष्पा २’च्या म्युझिक लाँचिंग इव्हेंटला होती. चित्रपटाच्या म्युझिक लाँचिंग इव्हेंटदरम्यान भर कार्यक्रमात रश्मिकाला लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
वरूण धवनचा ‘बेबी जॉन’ आहे 8 वर्ष जुन्या Theri चा रिमेक, कथेपासून ट्रेलरपर्यंत सर्वकाही
रश्मिका मंदान्ना चेन्नईमध्ये ‘पुष्पा २’च्या ‘किस्सिक’ गाण्याच्या लाँच इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. या इव्हेंटमध्ये रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनच्या फॅन्सने हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्री स्टेजवर येताच तिच्या फॅन्सने तिच्या कौतुकाचा आणि प्रेमाचा वर्षाव केला. विजय देवरकोंडासोबतच्या लंच डेटच्या चर्चांदरम्यान अभिनेत्रीला तिच्या खासगी आयुष्याबद्दल सुत्रसंचालकाने प्रश्न विचारला होता. रश्मिकाला सुत्रसंचालकाने प्रश्न विचारला की, “तुला लग्न करण्यासाठी फिल्म इंडस्ट्रीतील मुलगा हवाय की इंडस्ट्रीच्या बाहेरचा मुलगा हवाय ?” असा प्रश्न विचारल्यावर अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर खूप सुंदर स्माईल दिली. उत्तर देत रश्मिका म्हणाली की, “प्रत्येकालाच त्याच्याबद्दल माहिती आहे…” व्हिडिओच्या कमेंटवर नेटकऱ्यांचा अंदाज विजयकडेच आहे. प्रतिक्रिया देत असताना रश्मिकाने विजयचं थेट नाव घेतलं नाही.
Would you marry someone from the film industry or not?#RashmikaMandanna : “EVERYONE KNOWS ABOUT IT…!!” pic.twitter.com/PH7GIZykCn
— Gulte (@GulteOfficial) November 24, 2024
दरम्यान अभिनेत्रीला होस्टने पुढे सांगितलं की, तू जर आम्हाला तुझ्या लाईफ पार्टनरबद्दल स्पष्ट उत्तर दिलंस तर आम्ही तुझ्यासाठी तसा मुलगाही शोधू… या प्रश्नावर रश्मिकाने दिलेलं उत्तर ऐकून उपस्थित असलेल्या सेलिब्रिटींसह फॅन्समध्येही एकच हशा पिकला. रश्मिका म्हणाली की, “मला पूर्णपणे माहितीये की तुम्हाला माझ्याकडून कोणत्या उत्तराची अपेक्षा आहे ते… पण ठिकेय सध्या आपण त्या विषयात नको पडुयात, मी तुम्हाला नंतर खासगीत त्या प्रश्नाचं उत्तर सांगेन” गेल्या काही दिवसांपूर्वी विजय देवरकोंडाने दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “मी यापूर्वी एका सहअभिनेत्रीला डेट केलंय. मी सध्या ३५ वर्षांचा आहे आणि आतापर्यंत मी सिंगल असेल का? सर्वांना कधी ना कधी लग्न करायचंच असतं. प्रत्येकाला केव्हा ना केव्हा तरी लग्नबंधनात अडकायचंच असतं, जो पर्यंत आपल्या आवडीचा लाईफ पार्टनर मिळत नाही, तोपर्यंत आपण ते महत्वाचं पाऊल उचलत नाही…”
पाकिस्तानी सोशल मीडिया इन्फ्लूएंसरचा Private Video लीक, इंटरनेट विश्वात खळबळ
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाने २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘गीता गोविंदम’ चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर त्यांच्यातल्या रिलेशनची जोरदार चर्चा होत होती. २०१९ मध्ये, जेव्हा विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाने ‘डिअर कॉम्रेड’ चित्रपटात एकत्र काम केले, तेव्हाही त्यांच्या रिलेशनच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर झाल्या. रश्मिका मंदान्नाचा आगामी चित्रपट ‘पुष्पा २’ या वर्षाच्या अखेरीस ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.