Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asha Bhosale : ‘गाणं खरेपणाने गा…फक्त सुंदर गाऊ नका’, आशा भोसलेंच्या ‘जैत रे जैत’ च्या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा ‘तो’ किस्सा

आशाबाईंच्या गाण्यांची प्लेलीस्ट खूप मोठी आहे. पण आशा भोसले यांच्या संगीतातील कारकिर्दीबाबत बोलायचं झालंच तर हा या एका सिनेमाचा उल्लेख व्हायलाच पाहिजे तो सिनेमा म्हणजे जैत रे जैत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 12, 2026 | 01:50 PM
Asha Bhosale :  ‘गाणं खरेपणाने गा…फक्त सुंदर गाऊ नका’, आशा भोसलेंच्या ‘जैत रे जैत’ च्या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा ‘तो’ किस्सा
Follow Us
Follow Us:
  • जैत रे जैत’ च्या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा ‘तो’ किस्सा
  • गाणं खरेपणाने गा , असं का म्हणाले हृदयनाथ मंगेशकर ?
ज्यांच्या गळ्यात साक्षात सरस्वती वास करते, असं संगीतातील नामवंत घराणं म्हणजे मंगेशकर कुटुंबीय. चार बहिणी आणि एक भाऊ म्हणजे संगीतसृष्टीतील पाच पांडव. असं म्हणतात की लताबाई मंगेशकरांच्या आवाजाने रात्रीची शांत झोप लागते तर आशा भोसलेंच्या ठसकेबाज आवाजाने चैतन्य संचारतं. पाठीला पाठ लावून आलेल्या या बहिणी गाण्यात कोणाचाही हात धरु शकत नाहीत. आशाबाईंची खासियत म्हणजे ज्या ठसक्यात त्या लावणी गायच्या त्याचप्रमाणे त्या जीव ओतून भावगीत देखील गायच्या. मराठी, हिंदी, दाक्षिणात्य आणि हॉ़लीवूड देखील आशा भोसले यांनी सगळीकडे आपली छाप सोडली. आशाबाईंच्या गाण्यांची प्लेलीस्ट खूप मोठी आहे. पण आशा भोसले यांच्या संगीतातील कारकिर्दीबाबत बोलायचं झालंच तर हा या एका सिनेमाचा उल्लेख व्हायलाच पाहिजे तो सिनेमा म्हणजे जैत रे जैत.

जैत रे जैत सिनेमा आणि आशा भोसले हे एकेकाळी एक संगीतसृष्टीतलं समीकरण झालं होतं. स्मिता पाटील यांच्या अभिनयाने अजरामर झाालेल्या या सिनेमातील गाण्यांनी चार चाँद लावले. तुम्हाला माहितेय का या सिनेमाच्या रेकॉर्डींग वेळी एक किस्सा घडला होता.

Asha Bhosle Playlist: आवाजाच्या बाबतीत बहिणीलाही टक्कर देणाऱ्या आशा ताईंची जादुई सफर

सिनेमातल्या सगळ्याच गाण्याचं संगीत हृदयनाथ मंगेशकरांनी दिलं. मी रात टाकली या गाण्याचं रेकॉर्डींग होतं त्यावेळी एक किस्सा घडला होता. या गाण्यात एकाकीपणा, वेदना आणि जंगलातील शांतता ऐकू यायला हवी होती. पण स्टुडिओमध्ये गाणं गाताना तो फील येत नव्हता. काही केल्या हृदयनाथ मंगेशकरांना पाहिजे तसं गाणं होत नव्हतं. मग त्यांना एक वेगळी कल्पना सुचली. रेकॉर्डिंगच्या वेळी स्टुडिओतील लाईट्स कमी करण्यात आले, वातावरण शांत केलं आणि आशा ताईंना सांगितलं की, “तुम्ही स्वतःला एकटं समजा… जसं काही अंधारात बसून गात आहात. आणि मंगेशकरांनी गाण्यात जे हवं ते आशाबाईंच्या गळ्यातून उतरलं. मी रात टाकली म्हणणारी चिंगी समाजाच्या रुढी परंपरांविरोधात बंड पुकारणारी आदिवासी स्त्री.

तिला साजेसा असा रांगडेपणी पण त्यातही दु:ख, वेदना आणि समाजाबाबचा राग व्यक्त होतं अपेक्षित होतं ते शिवधनुष्य आशाबाईंनी चोख पार पाडलं. मंगेशकर आशाबाईंना कायम सांगत असे  गाणं सुंदर गाऊ नका… खरं गा. आणि आशाबाईंनी संगीतकार म्हणून मंगेशकरांचं ऐकलं देखील. जैत रे जैत सिनेमा जसा मोहन आगाशे आणि स्मिता पाटील यांच्या अभिनयाने अजरामर झाला त्याच तोडीसतोड ना.धो. महानोरांचे शब्द, हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आणि आशा भोसलेंचा जादुई आवाज याला देखील सिनेमाच्या यशाचं श्रेय जातं. आज आशा भोसले हे जग सोडून गेल्या तरी त्य़ांची गाणी काय़मच प्रेक्षकांच्या स्मरणात राहणार आहेत.

Asha Bhosle Biography: 2 वेळा लग्न, सासरी छळामुळे सोडले नवऱ्याचे घर, आयुष्यात आली अनेक संकटं

Web Title: Do you know the story of asha bhosles recording of the song jait re jait

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • Asha Bhosale
  • marathi cinema
  • navarashtra news

संबंधित बातम्या

Cheque Book Rules Change: चेकबुकबाबत मोठी बातमी! जुने चेकबुक होणार बंद? खातेदारांना करावा लागणार ‘हा’ बदल
1

Cheque Book Rules Change: चेकबुकबाबत मोठी बातमी! जुने चेकबुक होणार बंद? खातेदारांना करावा लागणार ‘हा’ बदल

Gen Z साठी मोठी बातमी! भारतात Starlinkची पुन्हा एन्ट्री? एलन मस्कांची नवी चाल
2

Gen Z साठी मोठी बातमी! भारतात Starlinkची पुन्हा एन्ट्री? एलन मस्कांची नवी चाल

Tecno Pova 8 Pro 5G भारतात दाखल! ‘अलाइव्ह मॅट्रिक्स’ डिस्प्लेने वेधलं लक्ष; किंमत-फिचर्स जाणून घ्या
3

Tecno Pova 8 Pro 5G भारतात दाखल! ‘अलाइव्ह मॅट्रिक्स’ डिस्प्लेने वेधलं लक्ष; किंमत-फिचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.