अज्ञात महिलेकडून आदित्य रॉय कपूरच्या घरात घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आता प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरच्या घरात एका अज्ञात महिलेने घुसण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वांद्रे पश्चिम येथील अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्या घरात एक अज्ञात महिलेने घुसण्याचा प्रयत्न केला आहे. या महिलने खोटं कारण सांगून अभिनेत्याच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला आहे. तेथील सुरक्षा रक्षकांनी तिला बाहेर पडण्यास सांगितले असता तिने घराबाहेर पडण्यास नकार दिला. अखेर पोलिसांना याबद्दलची माहिती देऊन त्या महिलेला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.
‘बालवीर’ फेम अभिनेत्रीला कोरोनाची लागण; म्हणाली, “खोकला-सर्दी झाल्यामुळे मी टेस्ट केली आणि…”
अभिनेता आदित्य रॉय कपूरच्या घरात एका अज्ञात महिलेने प्रवेश केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेने आदित्यसाठी भेटवस्तू आणि कपडे आणल्याचा दावा केला, मात्र नंतर त्या महिलेने घराबाहेर पडण्यास नकार दिला आणि अभिनेत्याच्या जवळ जाण्याचाही प्रयत्न केला. अखेर पोलिसांना याबद्दलची माहिती देऊन त्या महिलेला अटक करण्यात आली आहे. ही महिला मुळची दुबईची असून त्या महिलेचं नाव, गजाला झकारिया सिद्दीकी असं आहे. तिची ओळख पोलिस चौकशीमध्ये पटली आहे. आदित्यच्या घरातील मोलकरणीने खार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्याच्या घरामध्ये अज्ञात महिला घुसण्याचा प्रकार सोमवारी (२६ मे) संध्याकाळी प्रकार घडला आहे.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने केले Eggs Freeze! अनेक वर्षांनंतर केला खुलासा; आईनेही दिली साथ
आदित्य रॉय कपूरच्या घरामध्ये काम करणाऱ्या मोलकरणीने खार पोलिसांना घटनेची माहिती सांगताच काही काळातच ते अभिनेत्याच्या घरात दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी तिला तात्काळ अटक केली. ती महिला मुळची दुबईची आहे. तिने सुरक्षारक्षकांना खोटं सांगून आदित्यच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला आहे. त्या महिलेने आदित्यसाठी भेटवस्तू आणि कपडे आणल्याचा दावा केला होता. आदित्य सोमवारी २६ मे रोजी शुटिंगनिमित्त बाहेर गेला होता. त्यावेळी त्याची मोलकरिण घरी एकटीच होती. संध्याकाळच्या सहा वाजण्याच्या सुमारास अभिनेत्याच्या घराची बेल त्या अज्ञात महिलेने वाजवली.
दाराची बेल वाजवल्यानंतर आदित्यचे घर त्याच्या घरात घरकाम करणाऱ्या संगीता पवारने दार उघडलं तेव्हा त्यांच्या समोर एक अनोळखी महिला उभी होती. त्या महिलेने विचारले, “हे आदित्य रॉय कपूरचे घर आहे का?” जेव्हा संगिताने याची पुष्टी केली तेव्हा महिलेने सांगितले की तिला अभिनेत्याला काही भेटवस्तू आणि कपडे द्यायचे आहेत. महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून संगीताने तिला आत येऊ दिलं. या महिलेने तिचे नाव झकारिया सिद्दीकी अशी करून दिली जी ४७ वर्षांची असून ती दुबईची रहिवासी असल्यांच तिने सांगितलं. मोलकरिण संगिता यांनी घडलेला सर्व प्रकार आदित्यला सांगितला. त्यानंतर अभिनेत्याने त्या महिलेला घराबाहेर पडण्यास सांगितले. पण ती महिला अभिनेत्याच्या घरातून निघायला तयारच नव्हती. त्यानंतर आदित्यने सोसायटीच्या मॅनेजर जयश्री डुंकडू यांना कळवले, ज्यांनी अभिनेत्याची मॅनेजर श्रुती राव यांना कळवले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन खार पोलिसांत याबाबत तक्रार करण्यात आली.
जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यान घडणारी एक रहस्यमय गोष्ट; ‘समसारा’चं गूढ केव्हा उकलणार?
पोलिस चौकशीमध्ये त्या महिलेने आपली ओळख सांगितली. पण तिचा आदित्यच्या घरामध्ये घुसण्यामागील उद्देश काय होता ? या प्रश्नाचं उत्तर तिने दिले नाही. सध्या पोलिस त्या महिलेची कसून चौकशी करत असून तिच्यावरुद्ध खार पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. प्राथमिक तपासाच्या आधारे, पोलिसांनी असा निष्कर्ष काढला की ती महिला अभिनेत्याच्या घरात बेकायदेशीरपणे घुसली होती. कदाचित त्या महिलेचा अभिनेत्याच्या घरात घुसण्याचा गुन्हेगारी हेतू असावा. त्या महिलेविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३३१(२) (घरात घुसखोरी आणि घरफोडी) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला.