Balveer Fame Joyita Chatterjee Tests Positive For Covid-19
पुन्हा एकदा देशामध्ये कोरोना व्हायरस थैमान घालताना दिसत आहे. गेल्या आठवड्याभरात देशामध्ये ७५२ नवीन रुग्ण सापडले आहेत. सध्या देशामध्ये पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांची संख्या १००० च्या पुढे गेली आहे. सामान्य नागरिक कोरोनाच्या विळख्यात अडकत असताना, सेलिब्रिटी देखील कोरोनाच्या कचाट्यामध्ये अडकताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच शिल्पा शिरोडकर, निकिता दत्ता आणि तिची आई कोरोना पॉझिटिव्ह म्हणून आढळली होती. आता तिच्या नंतर आणखी एक हिंदी टिव्ही अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह म्हणून आढळली आहे.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने केले Eggs Freeze! अनेक वर्षांनंतर केला खुलासा; आईनेही दिली साथ
गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर, अभिनेत्री निकिता दत्ता आणि निकिताची आईलाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांना डॉक्टरांच्या अधिसुचनेमध्ये क्वारंटाईनमध्ये करण्यात आले होते. आता त्यानंतर आणखी एका टेलिव्हिजन अभिनेत्रीला कोरोनाची लागण झाली आहे. प्रसिद्ध हिंदी टिव्ही अभिनेत्री जोईता चॅटर्जी हिला कोरोनाची लागण झाली आहे. तिची कोव्हिड- १९ची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचा खुलासा तिने स्वत: इन्स्टाग्रामवर केला आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
जोइताला खोकला आणि सर्दी यांसारखी लक्षणं दिसल्यामुळे तिने कोव्हिडची चाचणी केली. टेस्ट केल्यानंतर जोइताचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जोइताने स्वतःलाच होम आयसोलेट केले आहे. शिवाय, अभिनेत्री कोविडसंबंधित सर्व नियमांचं पालन करताना दिसत आहे. जोइता चॅटर्जीने सांगितले की, “होय, हे खरं आहे की, माझी सध्या कोव्हिड-१९ ची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, मला विश्वास आहे की मी लवकरच बरी होईल. मी यापूर्वीच लसीकरण केले आहे, त्यामुळे मला वाटते की परिस्थिती लवकरच सामान्य होऊन मी पुन्हा आधीसारखी ठणठणीत होईल.”
जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यान घडणारी एक रहस्यमय गोष्ट; ‘समसारा’चं गूढ केव्हा उकलणार?
जोइताला कोरोना झाल्याचं कळताच तिच्या सेलिब्रिटी मित्रांकडून आणि चाहत्यांकडून तिला तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे जोइताने सर्वांचेच आभार मानले आहेत. लवकरच कामावर परतण्याची आशा व्यक्त केली. शिवाय, अभिनेत्रीने सर्वांनाच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. देशभरात कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होत असल्याने, नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. सर्वांनीच आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.