Akanksha Puri On Egg Freezing
प्रसिद्ध टेलिव्हिजन, चित्रपट आणि वेबसीरीज अभिनेत्री आकांक्षा पुरी सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. ३६ वर्षीय आकांक्षा पुरी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्यास अजिबात संकोच करत नाही. ती मोकळेपणाने बोलते. अलीकडेच, तिने उघड केले आहे की तिच्या आईने तिला तिचे बीजांड गोठवण्यासाठी कशी मदत केली आहे.
फिल्मीग्यानला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्री आकांक्षा पुरीने सांगितलं की, “मी बीजांड गोठवण्याचा (Eggs Freeze) निर्णय घेतला आणि ते केले सुद्धा. पण काही मुलींना याबद्दल कल्पनाच नाही. पण मी सहसा या निर्णयाबद्दल कोणाला काहीही सांगत नाही. बीजांड गोठवण्याच्या प्रक्रियेदरम्यान मुलींच्या शरीरामध्ये अनेक बदल होतात. शरीरामध्ये एक एएमएच पातळी (MH Level) असते, ज्यामुळे शरीरामध्ये बीजांड तयार होण्याचं प्रमाण कमी होतं, त्यानंतर तुमचे शरीर अशा टप्प्यावर पोहोचते जिथे ते तयार होणे थांबते.”
जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यान घडणारी एक रहस्यमय गोष्ट; ‘समसारा’चं गूढ केव्हा उकलणार?
मुलाखतीदरम्यान पुढे आकांक्षाने असं सांगितलं की, “आता आपण अशा युगात आहोत जिथे बीजांड गोठवता येते, त्यामुळे मी ही प्रक्रिया करून घेतली. आणि मी त्या निर्णयाबद्दल आता उघडपणे बोलतेय. जर मला पुढे भविष्यात आई व्हायचं असेल तर मी तयार असेल. मी ते करू शकत नाही असं नसेल. जर मला सिंगल मदर व्हायचं असेल तर तो पर्यायही माझ्यासाठी तो निर्णयही खुला असेल. आता मला कोणाचीही गरज नाही. मला कोणाची साथ लाभली नाही तर हरकत नाही, मी एकटीच बाळाला जन्म देऊ शकते.” आकांक्षाने मुलाखतीदरम्यान असं देखील सांगितलं की, या निर्णयामध्ये तिला तिच्या आईने खूप साथ दिली. शिवाय तिला तिची आई असं देखील म्हणाली की, आमच्याकडे हा पर्याय नव्हता. जर तुमच्याकडे आहे, तर तुम्ही त्या पर्यायाचा नक्की वापर करा, असं आकांक्षाने सांगितलं.