फोटो सौजन्य – सोशल मिडीया
टेलिव्हिजनवर राज्य करणारी निर्माती क्विन एकता कपुर सातत्याने चर्चेत राहिली आहे. ती तिच्या शोमुळे बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरली आहे. भारतामध्ये एकता कपुरचे असे अनेक शो आहेत जे सामन्य व्यक्तींच्या घरी रोज पाहिले जातात. यामध्ये क्युकी सास भी कभी बहु थी, कसोटी झिंदगी की, कुमकुम भाग्य या एकता कपुरच्या शो चाहत्यांनी भरपुर प्रेम दिले. तर दुसरीकडे एकता कपुरचे प्रोडक्शन ऑल्ट बालाजीमुळे ती सातत्याने वादामध्ये सापडली आहे. तिला बऱ्याचदा ऑल्ट बालाजीच्या अनेक शोमुळे ती सोशल मिडीवर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते.
दोन दिवसांपुर्वी ऑल्ट बालाजी त्याचबरोबर भारतामधील अनेक अश्लील दाखवणारे अॅपवर भारतामध्ये बंदी घालण्यात आली आहे. काल 25 जुलै रोजी, सरकारने एक मोठे पाऊल उचलले आणि अश्लील शो प्रोडक्सन देणाऱ्या अनेक OTT प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे, त्यापैकी एक ALTT होता. त्याचे पूर्वीचे नाव ALT बालाजी होते, ज्याचे सह-संस्थापक टीव्ही क्वीन एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर होते. जितेंद्र यांची मुलगी एकता कपूरचा ‘अल्ट बालाजी’ हा शो त्याच्या कंटेंटमुळे अनेकदा वादात सापडला आहे.
Bigg Boss 19: बिग बॉसचे काऊंटडाऊन सुरू, सलमान खानच्या शो चा पहिला लुक समोर, बदलला Logo
आता सरकारने ऑल्ट बालाजीवर बंदी घातल्यानंतर, एकता कपुरने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले आहे. ALTT वर बंदी आल्यानंतर लगेचच, एकता कपूरने एक निवेदन जारी करून तिचा राग व्यक्त केला आणि या OTT प्लॅटफॉर्मपासून स्वतःला स्पष्टपणे दूर केले. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक निवेदन जारी केले ज्यामध्ये म्हटले आहे की तिचा आता ALTT शी काहीही संबंध नाही. तिने २०२१ मध्येच याच्याशी संबंध तोडले.
एकता कपूरच्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, “प्रसारमाध्यमांमध्ये असे वृत्त आहे की अधिकाऱ्यांनी ALTT वर बंदी घातली आहे, परंतु या वृत्तांच्या विपरीत, मिस एकता कपूर आणि श्रीमती शोभा कपूर कोणत्याही प्रकारे ALTT शी संबंधित नाहीत आणि त्यांनी जून २०२१ मध्येच ALTT शी त्यांचे संबंध तोडले. वर नमूद केलेल्या तथ्यांच्या विरुद्ध असलेले कोणतेही आरोप जोरदारपणे नाकारले जातात आणि मीडियाला योग्य तथ्ये सादर करण्याची विनंती केली जाते.”
ही पोस्ट शेअर करताना एकता कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले, “ज्यांना याबद्दल चिंता आहे त्यांच्यासाठी.” काही दिवसांपूर्वी एकता कपूरने एका मुलाखतीत ALTT वर दाखवल्या जाणाऱ्या कंटेंटचा बचाव केला होता हे ज्ञात आहे.