रुग्णालयाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 10:20 वाजता राजू श्रीवास्तव यांना मृत घोषित करण्यात आले.राजू श्रीवास्तव यांच्या आकस्मिक निधनाने त्यांचे कुटुंबीय आणि चाहते दु:खी झाले आहेत.
1980 च्या दशकापासून मनोरंजन विश्वात सक्रिय असलेले, राजू श्रीवास्तव स्टँड-अप कॉमेडी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजच्या पहिल्या सत्रात भाग घेतल्यानंतर 2005 मध्ये प्रसिद्ध झाले. कॉमेडियनने मैं प्यार किया, बाजीगर, बॉम्बे टू गोवा या चित्रपटांमध्ये काम केले. बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनमध्येही तो दिसला होता.