Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रसिद्ध गायिकेचा आगीत होरपळून मृत्यू; नव्वदच्या दशकात गाजलं होतं नाव

हॉलिवूड इंडस्ट्रीतील संगीत जगतात आपल्या जादुई आवाजाने सर्वांवर भुरळ टाकणारी सुप्रसिद्ध गायिका आणि गीतकार जिल सोबुले हिचं निधन झाले आहे. सुप्रसिद्ध गायिकेच्या निधनाच्या वृत्ताने हॉलिवूड इंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला.

  • By चेतन बोडके
Updated On: May 02, 2025 | 01:50 PM
प्रसिद्ध गायिकेचा आगीत होरपळून मृत्यू; नव्वदच्या दशकात गाजलं होतं नाव

प्रसिद्ध गायिकेचा आगीत होरपळून मृत्यू; नव्वदच्या दशकात गाजलं होतं नाव

Follow Us
Close
Follow Us:

हॉलिवूड इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. संगीत जगतात आपल्या जादुई आवाजाने सर्वांवर भुरळ टाकणारी सुप्रसिद्ध गायिका आणि गीतकार जिल सोबुले (Famous Singer Jill Sobule) हिचं निधन झाले आहे. सुप्रसिद्ध गायिकेच्या निधनाच्या वृत्ताने हॉलिवूड इंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गुरूवारी अर्थात १ मे रोजी अभिनेत्रीचं निधन झालं आहे, ती ६६ वर्षांची होती. ९० च्या दशकातील प्रसिद्ध गायिका आणि गीतकारांपैकी एक असलेल्या जिलच्या अचानक जाण्याने म्युझिक इंडस्ट्रीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे, ही पोकळी भरुन निघणारी नाही.

पाकिस्तानी अभिनेत्रीने व्हायरल पोस्टवर सोडले मौन, म्हणाली- ‘मी हे विधान केले नाही…’

जिल नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध हॉलिवूड गायिका असून त्यांना ‘आई किस्ड अ गर्ल’ या गाण्यातून जगभरात विशेष लोकप्रियता मिळाली. ६६ वर्षीय जिल सोबुलेच्या घरात आग लागली होती. या आगीमध्ये होरपळून त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. गुरूवारी, १ मे रोजी मिनेसोटा येथील एका घराला लागलेल्या आगीत गायिकेचा मृत्यू झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले. शुक्रवारी म्हणजेच २ मे रोजी जिलचा एक गाण्याचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल आपल्या चाहत्यांना मंत्रमुग्ध करणार होती. पण त्याआधीच एक वाईट अपघात घडला ज्यामध्ये त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला.

Deepika Singh: ‘या’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला अचानक रुग्णालयात केले दाखल, हेल्थ अपडेटसह शेअर केली पोस्ट!

जिल सोबुले यांची मॅनेजर जॉन पोर्टर (John Porter) यांनी मिनेसोटा स्टार ट्रिब्यूनला (Minnesota Star Tribune) या अमेरिकन न्यूजपेपरला दिलेल्या माहितीमध्ये गायिकेच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. गायिकेच्या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, जिल शुक्रवारी, २ मे रोजी त्यांच्या गावी डेन्व्हरमध्ये आत्मचरित्रात्मक स्टेज संगीतमय ७ व्या ग्रेडचे प्रदर्शन करण्यासाठी सादरीकरण करणार होत्या. पण त्या आधीच त्यांचे निधन झाल्यामुळे चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातून चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे. २०२३ मध्ये ड्रामा डेस्क पुरस्कारासाठी त्या नामांकित झाल्या होत्या.

Dharmendra Hema: ४५ वर्षांपूर्वीच एकमेकांत गुंतले होते हेमा- धर्मेंद्र; मुलगी आयशा लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाली…

जिल सोबुले ९० च्या दशकातील प्रसिद्ध गायिका आणि गीतकारांपैकी एक आहे. तिने आपल्या दमदार आवाजाच्या माध्यमातून चाहत्यांची मने जिंकली आहेत. तिला ‘आय किस्ड अ गर्ल’, ‘क्लुलेस’ आणि ‘सुपरमॉडेल’ या चित्रपटांमधून सर्वाधिक ओळख मिळाली. १९९० मध्ये तिने स्वत:चं ‘थिंग्ज हियर आर डिफरंट’ नावाचं अल्बम साँग रिलीज केला आणि मागे वळून पाहिले नाही. जिल सोबुले तिच्या गायन शैलीसाठी ओळखली जात होती. तिने नेहमीच आपल्या गाण्यामधून महिलांना सक्षम आणि मजबूत व्यक्तिमत्त्वाच्या रूपात चित्रित केले. तिने ९० च्या दशकात ‘आय किस्ड अ गर्ल’ नावाचं गाणं बनवलं, त्यावेळी अशी गाणी क्वचितच बनवली जात असत. १९९० नंतरही त्यांनी अनेक अल्बम रिलीज केले आणि चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांसाठी गाणी तयार केली. २०२३ मध्ये त्यांनी एक नाटकही लिहिले. हे नाटक तिच्या बालपणीवर आधारित होते आणि लोकांना ते खूप आवडले.

Web Title: Famous hollywood singer jill sobule dies in minneapolis house fire reveals before her performance know about it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 01:12 PM

Topics:  

  • Hollywood
  • Hollywood News
  • Hollywood Singer

संबंधित बातम्या

Avatar 3 Worldwide Collection: ख्रिसमस आधीच ६ दिवसांत ४००० कोटींचा टप्पा पार, भारतात १०० कोटींची कमाई
1

Avatar 3 Worldwide Collection: ख्रिसमस आधीच ६ दिवसांत ४००० कोटींचा टप्पा पार, भारतात १०० कोटींची कमाई

‘The Lion King’ मधील अभिनेत्रीचा दुःखद मृत्यू; दीर्घकालीन बॉयफ्रेंडवर हत्या केल्याचा आरोप? सुरु आहे चौकशी
2

‘The Lion King’ मधील अभिनेत्रीचा दुःखद मृत्यू; दीर्घकालीन बॉयफ्रेंडवर हत्या केल्याचा आरोप? सुरु आहे चौकशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.