Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zakir Hussain : उस्ताद झाकीर हुसैन यांची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताक झाकीर हुसेन यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे. झाकीर हुसेन यांना सध्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 15, 2024 | 09:22 PM
'वाह ताज'ची जाहीरात अन् केस न कापण्याची शर्थ...; झाकीर हुसैन यांच्या कुरळ्या केसांमागील आहे अशी रोचक कथा

'वाह ताज'ची जाहीरात अन् केस न कापण्याची शर्थ...; झाकीर हुसैन यांच्या कुरळ्या केसांमागील आहे अशी रोचक कथा

Follow Us
Close
Follow Us:

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताक झाकीर हुसेन यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे. झाकीर हुसेन यांना सध्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. झाकीर हुसेन यांना तातडीने रुग्णालयात दाखल केल्याची माहिती त्यांचे जवळचे मित्र आणि बासरीवादक राकेश चौरसिया यांनी दिली आहे.

महाराष्ट्राच्या दादा-वहिनीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा, फॅशनने वेधलं लक्ष

झाकीर हुसेन यांना रुग्णालायत दाखल केल्याच्या बातमीने त्यांचे लाखो चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासूनचे त्यांचे संगीत क्षेत्रातील योगदान अमुल्य आहे. त्यांचे चाहते एकट्या भारतात नसून जगभरात आहेत. त्यांच्या प्रकृतीची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे.

झाकीर हुसैन यांचे जवळचे मित्र आणि बासरीवादक राकेश चौरसिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यातच झाकीर यांना हृदयाशी संबंधित समस्यांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण आता सध्या झाकीर हुसेन यांची प्रकृती चिंताजनक आहे. शिवाय, पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, झाकीर हुसैन यांच्या जवळच्या व्यक्तीच्या हवाल्याने सांगितले की, ७३ वर्षीय झाकीर हुसैन यांना दीर्घ काळापासून रक्तदाबाशी संबंधित समस्या आहे.

 

Ustad Zakir Hussain, Tabla player, percussionist, composer, former actor and the son of legendary Tabla player, Ustad Allah Rakha is not well. He’s being treated for serious ailments in a San Francisco hospital, USA, informed his brother in law, Ayub Aulia in a phone call with… pic.twitter.com/6YPGj9bjSp — Pervaiz Alam (@pervaizalam) December 15, 2024

पत्रकार परवेझ आलम यांनीदेही झाकीर हुसेन यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे. त्यांनी झाकीर यांचा फोटो एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) शेअर करत सांगितले की, ‘महान तबलावादक अल्ला राखा यांचे पुत्र उस्ताद झाकीर हुसेन यांची तब्येत ठीक नाही. त्यांच्यावर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचे मेहुणे आयुब औलिया यांनी मला फोनवरून ही माहिती दिली. लंडनमध्ये राहणाऱ्या औलिया साहेबांनी चाहत्यांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.’ दरम्यान, ही माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली असून, चाहते त्यांना लवकरात लवकर ठीक होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

बिष्णोई समाजाच्या बलिदानाची कहाणी येतय प्रेक्षकांच्या भेटीला, ‘साको 363’ चा थरारक टीझर रिलीज

उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 1951 मध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे झाला. झाकीर हुसेन यांना भारत सरकारचे महत्वाचे मानल्या जाणाऱ्या पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. झाकीर हुसैन यांचे नाव जगभर प्रसिद्ध असून भारतासह अनेक देशांमध्ये त्यांचे करोडो चाहते आहेत. ७३ वर्षीय झाकीर हुसेन यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच तबला वाजवण्याचा सराव सुरू केला होता. वयाच्या ७ व्या वर्षी त्यांनी प्रोफेशनल पद्धतीने तबला वाजवायला सुरुवात केली होती. तर वयाच्या ११ व्या वर्षी झाकीर हुसेन यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कार्यक्रमांमध्ये आपले कौशल्य दाखवायला सुरुवात केली होती.

किर्ती सुरेशने बॉयफ्रेंडसोबत गोव्यात बांधली लग्नगाठ, पाहा Photo

उस्ताद झाकीर हुसेन हे पहिले भारतीय संगीतकार आहेत, ज्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये ऑल-स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले होते. झाकीर हुसेन यांनी केवळ तबला वादक म्हणून काम केले नाही तर ते एक उत्कृष्ट अभिनेता देखील आहेत, त्यांनी 80 च्या दशकातील काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. याशिवाय, १९९९ मध्ये त्यांना यूएस नॅशनल एन्डॉवमेंट फॉर द आर्ट्सद्वारे राष्ट्रीय वारसा फेलोशिप प्रदान करण्यात आली, त्यानंतर त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताचे जागतिक राजदूत म्हणून मान्यता मिळाली.

Web Title: Famous tabla player zakir hussain hospitalized in usa informed by his brother in law

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2024 | 09:11 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Zakir Husain

संबंधित बातम्या

लग्नाआधी ८ महिन्यांची लिव्ह-इन स्टोरी; सैफ-अमृताच्या नात्यामागचं गूढ उलगडलं
1

लग्नाआधी ८ महिन्यांची लिव्ह-इन स्टोरी; सैफ-अमृताच्या नात्यामागचं गूढ उलगडलं

वरुण धवनच्या घरी कन्या पुजनाचे आयोजन, सोशल मीडियावर शेअर केल्या खास क्षणांच्या आठवणी
2

वरुण धवनच्या घरी कन्या पुजनाचे आयोजन, सोशल मीडियावर शेअर केल्या खास क्षणांच्या आठवणी

Aditya Sarpotdar दिग्दर्शित ‘Thamma’ चा Trailer प्रदर्शित; हॉरर, थ्रिलर आणि कॉमेडीसह Rashmika-Ayushmann ची अनोखी केमिस्ट्री
3

Aditya Sarpotdar दिग्दर्शित ‘Thamma’ चा Trailer प्रदर्शित; हॉरर, थ्रिलर आणि कॉमेडीसह Rashmika-Ayushmann ची अनोखी केमिस्ट्री

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसला दिलासा नाही; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावली, जाणून घ्या नेमकं काय होतं प्रकरण
4

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसला दिलासा नाही; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावली, जाणून घ्या नेमकं काय होतं प्रकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.