लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेश हिने बॉयफ्रेंड अँटनी थट्टिलसोबत गोव्यात लग्नगाठ बांधली आहे. कीर्तीने आणि अँटनीने ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठ बांधली आहे. तिने तिच्या लग्नातील काही सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Keerthy Suresh And Boyfriend Antony Thattil Wedding Photos
लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेश हिने बॉयफ्रेंड अँटनी थट्टिलसोबत लग्नगाठ बांधली आहे. कीर्तीने गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठ बांधली आहे. तिने तिच्या लग्नातील काही सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने काही मिनिटांपूर्वीच लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंवर ForTheLoveOfNyke असा हॅशटॅग वापरून अभिनेत्रीने फोटो लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. कीर्तीने लग्नातील सर्वच विधींसाठी वेगवेगळे लूक केले होते.
किर्ती सुरेशने लग्नामध्ये व्हाईट कलरचा डिझायनिंग वेस्टर्न ड्रेस आणि तिचा बॉयफ्रेंड अँटनी थट्टिलनेही व्हाईट कलरचा कोट, शर्ट आणि पँट वेअर केली आहे. दोघांनीही लग्नामध्ये खास पद्धतीने एन्ट्री घेतली असून त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
किर्तीने आणि अँटनीने एकमेकांना लग्नामध्ये किसही केलं. किर्तीच्या नवऱ्याची एन्ट्री ब्लॅक अलिशान कारमधून झाली आहे. लग्नातील सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर कीर्तीला या नवीन प्रवासासाठी सेलिब्रिटी आणि चाहते शुभेच्छा देत आहेत.
कीर्ती सुरेश चित्रपट निर्माते जी. सुरेश कुमार आणि अभिनेत्री मेनका यांची मुलगी आहे. किर्तीने बालकलाकार म्हणून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. नंतर ‘गीतांजली’या मल्याळम चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारत अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. आता ती तामिळ आणि तेलुगू सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांपैकी एक आहे.
अँटनी आणि कीर्ती शाळेत एकत्र शिकायचे, दोघांचं लहानपणीचं प्रेम आहे. अँटनी हा बिझनेसमन असून तो दुबईत राहतो. कीर्ती आणि अँटनी दोघे गेल्या १५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.