बॅकग्राउंड डान्सर ते सुपरहिरो; स्टारकिड असूनही शाहिद कपूरला इंडस्ट्रीत करावा लागला होता संघर्ष...
शाहिद कपूर बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. पण तो, स्टारकिड्स पैकी एक असला तरीही त्याने अनेक नकारांना पाठी सारत एक यशस्वी अभिनेता तो झाला आहे. ‘कबीर सिंह’मधील रावडी आणि डॅशिंग असलेल्या कबीर सिंहचा आज वाढदिवस आहे. शाहिद कपूरचं आजही नाव जरीही घेतलं तरीही आपल्या नजरेसमोर एका क्षणात चटकन रावडी आणि डॅशिंग कबीर सिंह येतोच. शाहिदच्या आज वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दलच्या तुम्हाला माहित नसलेल्या काही खास बाबी आज आपण जाणुन घेवुया…
महाशिवरात्रीनिमित्त ‘इंद्रायणी’ आणि ‘#लय आवडतेस तू मला’ मालिकांचे विशेष भाग
२५ फेब्रुवारी १९८१ रोजी दिल्लीत जन्मलेल्या शाहिदचे आई वडिल ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते पंकज कपूर आणि निलिमा अजीम आहे. त्यांच्या दोघांचाही घटस्फोट अभिनेता तीन ते चार वर्षांचा असताना झाला. आई- वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर अभिनेता, त्याची आई, आजी- आजोबा दिल्लीतच राहायचे. शाहिदचे आजी-आजोबा पेशाने पत्रकार होते. शाहिद त्याच्या आजोबांच्या अतिशय जवळ होता. शाहिदने आजोबांबद्दल बोलताना सांगितलं, की ते नेहमी त्याला शाळेत घेऊन जायचे. तसंच आजोबा शाहिदच्या वडिलांबद्दलही बोलायचे, ज्यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध होते. तसंच शाहिदसाठी ते त्याच्या वडिलांची पत्रही वाचून दाखवत होते. त्यावेळी पंकज कपूर यांचा इंडस्ट्रीत कठीण काळ चालू होता आणि ते शाहिदला त्याच्या वाढदिवशी भेटायला यायचे.
शाहिदनेही आपल्या करियरच्या काळात बराच कठीण काळ पाहिला आहे. त्याने करियरच्या टर्निंग पॉईंटवर असताना बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केले आहे. ‘दिल तो पागल है’ आणि ‘ताल’ सारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये शाहिदने बॅकग्राउंड डान्सर काम केले आहे. त्यानंतर अभिनेत्याने अनेक जाहिरातींमध्येही काम केले. बऱ्याच संघर्षानंतर शाहिदने 2003 मध्ये ‘इश्क विश्क’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. शाहिदला त्याच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत त्याच्या लूकमुळे त्याला ‘चॉकलेट बॉय’ म्हणून बोलायचे. शाहिदला त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी काही पुरस्कारही मिळाले पण ही फक्त सुरुवात होती. त्यानंतर शाहिदचे ‘फिदा’, ‘दिल मांगे मोरे’, ‘दीवाने हुए पागल’, ‘शिखर’, ‘वाह लाईफ हो तो ऐसी’, ‘३६ चायना टाउन’ त्याचे हे सलग चित्रपट फ्लॉप झाले. प्रेक्षकांना शाहिद आवडला असला तरी, त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले होते.
रणवीर अल्लाहबादियासह आशिष चंचलानी अडचणीत, महाराष्ट्र सायबर सेलसमोर चौकशीसाठी हजर!
२००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विवाह’ चित्रपटाने शाहिदचे बुडते करिअर वाचवले आणि तो चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर, ‘जब वी मेट’ने शाहिदच्या फिल्मी करियरला नवीन उंचीवर नेण्यास मदत केली. तथापि, यानंतरही शाहिदच्या कारकिर्दीचा आलेख चढ-उतारच होत राहिला. शाहिदने आपल्या फिल्मी कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपट आणि वेबसीरीज दिले आहेत, ज्यात ‘विवाह’ आणि ‘जब वी मेट’ व्यतिरिक्त ‘कमीने’, ‘हैदर’, ‘उडता पंजाब’, ‘पद्मावत’, ‘कबीर सिंग’चित्रपटासोबतच ‘फर्जी’वेबसीरीजचाही समावेश आहे. शाहिद कपूरची २०२३ साली रिलीज झालेल्या ‘फर्जी’वेबसीरीजची अवघ्या इंडस्ट्रीमध्ये तुफान चर्चा झाली होती. त्याच्या ओटीटी पदार्पणावर कौतुकाचा वर्षाव झाला होता.
दहाव्या दिवशीही ‘छावा’चाच बोलबाला! कमाईत पार केला 300 कोटींचा टप्पा; एकूण कलेक्शन किती?
शाहिद कपूरने ७ जुलै २०१५ रोजी मीरा राजपूतशी लग्न केले. शाहिद आणि मीरा यांची गणना कायमच क्यूट कपलमध्ये केली जाते, दोघेही एकत्र खूप सुंदर दिसतात. शाहिद आणि मीरा यांना दोन मुले आहेत. खरंतर, लग्नापूर्वी शाहिदचे नाव ऋषिता भट्ट, अमृता राव, करीना कपूर, सानिया मिर्झा, विद्या बालन, प्रियांका चोप्रा, सोनाक्षी सिन्हा, अनुष्का शर्मा, बिपाशा बसू आणि नर्गिस फाखरी यासारख्या अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते. शाहिद कपूरला ‘फॅमिली मॅन’ म्हणणं अजिबात चुकीचे ठरणार नाही. एकीकडे शाहिद त्याच्या व्यावसायिक कामांसाठी बराच वेळ देतो, तर दुसरीकडे तो त्याच्या कुटुंबालाही बराच वेळ देतो. पत्नी मीरा व्यतिरिक्त, शाहिद अनेकदा त्याची मुले, आई- वडिल आणि भाऊ ईशान खट्टर यांच्यासोबत वेळ घालवताना दिसतो.