(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील मराठवाडा, सोलापूर, अहिल्यानगर, आणि जळगाव जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून, शेती, घरे, जनावरे आणि व्यवसायांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये आणि नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.डोळ्यांदेखत शेतातील पिकांचे नुकसान होत असल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत. ओला दुष्काळ जाहीर करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. शासनाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत काही ठिकाणी मदतकार्य सुरू केल्याचेही सांगितले जात आहे. पावसाने झालेल्या नुकसानीमुळे नैराश्यूतून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या दु:खद घटना घडल्याचे वृत्त येत आहेत. त्यामुळे या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकारकडून मदत केली जात आहे. तसेच अनेकांनी आपल्या परीन मदतीचा हात पुढे केला आहे.
वल्लरीची मनोजला मिळणार खंबीर साथ! ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेचे नवे वळण
अशातच मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. सोशल मीडियावरून त्यांनी एक भावनिक आवाहन करत जनतेला आणि इतर कलाकारांनाही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या सामाजिक जाणीवेच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
‘तुळजाभवानीचा आशिर्वाद म्हणूनच ही भूमिका मिळाली’, देवीच्या भक्तीत लीन पूजा काळे
प्रविण तरडे यांनी व्हिडिओमध्ये ८९५५७७१११५ हा हेल्पलाइन क्रमांकाचं पोस्टर हातात घेऊन म्हटलं आहे की, “एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ ही ओळ लक्षात ठेवा. ज्यांना मदत करायची आहे आणि ज्यांना मदतीची गरज आहे त्यांनी हा नंबर लक्षात ठेवा. हा नंबर खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ३६ पैकी ३१ जिल्हे बाधित झाले आहेत. १९५ तालुक्यातील २७ लाख शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आमची विनंती आहे की, तुम्ही हा नंबर लक्षात ठेवा. आता मदत नसेल, पण पुढे कधीही गरज लागल्यास या नंबरवर संपर्क साधा. प्रशासन, शासकीय अधिकऱ्यांच्या सहाय्याने आपण ही मदत करत आहोत. आपल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करू. सगळ्यांनी या नंबरवर संपर्क साधा आणि याद्वारे मदतही करा”.यासोबतच त्यांनी कॅप्शनमध्ये शेतकरी मायबापानो आत्महत्येचा विचार नको, फक्त एक फोन करा” असे भावनिक आवाहन केले आहे