प्रतिनिधी, मुंबई
“या देशातील बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजाला देखील अनेकदा अन्याय, अत्याचार अनन्वित पणे सहन करावे लागतात. वास्तविक केवळ अल्पसंख्यांकावरच अन्याय होतात, असे भासवून बहुसंख्य हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाची अनेकदा खिल्ली उडवली जाते. काश्मीरमधील हिंदू पंडितांवर झालेल्या तीन दशकांपूर्वीच्या नरसंहाराची वास्तव कहाणी म्हणजे काश्मीर फाइल्स हा चित्रपट आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रत्येक भारतीयाने पाहिला पाहिजे”, असे मत भाजपा मुंबई प्रदेश सचिव सचिन शिंदे यांनी व्यक्त केले आहे. दादर माटुंगा परिसरातील नागरिकांसाठी त्यांनी या चित्रपटाचे मोफत प्रदर्शन आयोजित केले आहे, त्यानिमित्ताने ते बोलत होते.
[read_also content=”धक्कादायक! ऐकावं ते नवलंच!! महाकाय अजगरावर बसून खेळत होता चिमुकला, व्हिडिओ पाहून थरकाप उडेल https://www.navarashtra.com/viral/the-child-was-playing-sitting-on-a-giant-python-trembling-after-watching-the-shocking-video-nrvb-256029.html”]
“या चित्रपटातील प्रत्येक प्रसंग आणि घटना पाहणाऱ्याच्या अंगावर येतात. चित्रपटगृहातून बाहेर पडताना तुम्ही एक तर विषन्न झालेले असता किंवा आपल्याच बांधवांवर झालेल्या अनन्वित अत्याचारांच्या या घटनेमुळे पेटून उठलेले असता. खरं तर या चित्रपटाबद्दल काही लोकांकडून जाणीवपूर्वक अपप्रचार होतो आहे. माञ हिंदू पंडितांवर कशा पद्धतीने अन्याय आणि अत्याचार झाला त्याचं भीषण वास्तव यथार्थपणे मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे, असे मला वाटते , म्हणूनच हा चित्रपट नागरिकांनी पाहिलाच पाहिजे असे माझे ठाम मत झाल्याने आपल्या विभागातील नागरिकांसाठी मी या चित्रपटाचा शो दादर येथील नक्षत्र सिनेमागृहात शुक्रवारी आणि शनिवारी संध्याकाळी आयोजित केला आहे” अशी माहिती सचिन शिंदे यांनी दिली.