'पिलिंग्स'ने घालवल्या सर्व 'फिलिंग्स', "फुल्ल छपरी डान्स स्टेप्स...‘पुष्पा २’मधल्या गाण्यातल्या वल्गर स्टेप पाहून नेटकरी संतापले
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा बहुप्रतिक्षित ‘पुष्पा २’ चित्रपट येत्या ५ डिसेंबरला जगभरातल्या बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर आणि इतर गाणी आली असून यात अल्लू अर्जुनचा अभिनय, डायलॉग्स आणि जबरदस्त डान्स दिसत आहे. तेव्हापासून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. अशातच नुकतंच सोशल मीडियावर चित्रपटातलं ‘पीलिंग्स’ हे गाणं रिलीज झालं आहे. हे गाणं रिलीज होताच अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. चित्रपटातल्या हूक स्टेप्स पाहून चाहते नाराज झाले आहेत. काही युजर्सने चित्रपट दमदार कमाई करणार नाही, अशाही कमेंट केल्या आहेत.
अभिनय सोडण्याच्या घोषणेनंतर विक्रांत मेस्सीची मीडियासमोर उपस्थिती, काय म्हणाला जाणून घ्या?
पहिला भाग ‘पुष्पा : द राइज’ २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केलेल्या रेकॉर्डब्रेक कमाईप्रमाणेच ‘पुष्पा २ द रुल’कडूनही प्रचंड अपेक्षा आहेत. पहिल्या भागात ‘ऊ अंटावा’ आणि ‘बलम सामे’ही गाणी अल्लू अर्जुनच्या हटके डान्स स्टाईलमुळे गाजली. चित्रपटातील ‘किसीक’ प्रमाणे ‘ऊ अंटावा’आयटम साँग गेल्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. पण पहिल्या भागात ज्याप्रमाणे रश्मिका आणि अल्लू अर्जुन ‘बलम सामे’वर एकत्र थिरकले त्याप्रमाणे या पार्टमधलं दुसरं गाणं रिलीज झालं नव्हतं. आता ते गाणं रिलीज झालं आहे.
ते गाणं पाहून नेटकरी कमालीचे संतापले आहे. ‘पीलिंग्स’ असं त्या गाण्याचं नाव असून गाण्यातल्या विचित्र डान्स स्टेप्सपाहून नेटकऱ्यांनी चित्रपटाला ट्रोल केलं आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत गाण्याला ट्रोल केलं आहे. “अल्लू अर्जुन सरांकडून हे अपेक्षित नव्हतं, या प्रकारच्या डान्स स्टेप्समुळे तुमचं डान्स स्किल पूर्णपणे नष्ट झाले आहे…”, “ह्या गाण्यामुळे ‘पुष्पा’ने चाहत्यांना नाराज केलं आहे.”, “ह्या गाण्यामुळे चित्रपट खास कमाई करणार नाही.” तर काहींनी छपरी डान्स स्टेप्स म्हणत ट्रोल केलं आहे.
लहानाचा मोठा झाला त्या चाळीला दत्तू मोरेचं नाव, अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या किस्सा
‘पुष्पा २’मधील ‘पीलिंग्स’ गाण्याला युट्युबवर रिलीज होताच काही मिनिटातच लाखोंच्या घरात व्ह्यूज आले आहेत. ‘बलम सामे’ गाण्याप्रमाणेच ‘पीलिंग्स’ या गाण्यात रश्मिका आणि अल्लू अर्जुनची जबरदस्त केमिस्ट्री दिसत असून गाण्यावर या दोघांनी दमदार डान्स केला आहे. ‘पीलिंग्स’ हे गाणे खूप एनर्जेटिक असून अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांनी सळसळत्या ऊर्जेने डान्स केला आहे. गाण्यातील स्टेप्स या साऊथच्या ढंगातील जे डान्स असतात तशाच जबरदस्त असून अनेक किचकट स्टेप्स अल्लू अर्जुन आणि रश्मिकाने एकदम सहजरित्या केल्या आहेत.