लहानाचा मोठा झाला त्या चाळीला दत्तू मोरेचं नाव, अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या किस्सा
दत्तू मोरे ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’ तलं प्रसिद्ध चेहऱ्यापैकी एक नाव. आपल्या अभिनयाच्या कतृत्वावर महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्ध झाला. आज दत्तू मोरेचा वाढदिवस आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…
आपण ज्या चाळीमध्ये राहतो, त्या चाळीला जर आपलं नाव दिलं तर ? आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर भूरळ घालणाऱ्या दत्तू मोरेसोबत असंच काहीसं घडलं आहे. मुक्काम पोस्ट ‘दत्तू मोरे चाळ’… ज्या चाळीमध्ये दत्तू मोरे लहानाचा मोठा झाला त्या चाळीला दत्तू मोरेचं नाव देण्यात आलं आहे. दत्तू मोरेचं नाव तो राहत असलेल्या चाळीला जुलै २०२२ मध्ये देण्यात आलं. मुळचा ठाण्याचा असलेला दत्तू मोरे वागळे इस्टेट येथील रामनगर भागातल्या साध्या चाळीत तो लहानाचा मोठा झाला. त्याची फिल्मी करियर, कामाचे कौतुक आणि त्याच्या कामाचा चढता आलेख पाहता चाळीला ‘दत्तू चाळ’ हे नाव देण्यात आलं होतं.
‘पुष्प राज’ ची चढली चाहत्यांना जादू; 48 तासात बंपर कमाई, जाणून घ्या आकडेवारी!
चाळीला दत्तू मोरेचं नाव देण्यात आल्यानंतर त्याने प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणाला की, “पहिली गोष्ट म्हणजे, आमच्या चाळीला नाव नव्हतं. अनेकदा अमुक तमुक चाळीच्या बाजुची चाळ, असं सांगितलं जायचं. आता ती चाळ माझ्या नावानं ओळखली जात आहे, हे ऐकून खूप छान वाटतंय. माझ्या चाळीला माझं नाव दिलं आहे, हे ऐकून हास्यजत्रेच्या टीमचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांनी सर्वांनीच माझं कौतुक केलं होतं. पण चाळीला माझं नाव म्हणजे हे माझ्यासाठी एक स्वप्नवतच होतं. आता चाळीला माझं नाव मिळालंय, म्हटल्यावर ही गोष्ट माझ्यासाठी आनंददायी आहे. यामुळे मला कामाचा हुरूप येतो.”
रशियन अभिनेत्रीच्या मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या कोण होती कमिला बेल्यातस्काया?
मुलाखतीमध्ये पुढे दत्तू म्हणाला, “या गोष्टीमुळे मला काम करण्याची जिद्द मिळाली आहे. पुढेही असंच चांगलं काम करायचा माझा प्रयत्न असेल.” हास्यजत्रा फेम वन अँड ओन्ली दत्तू मोरे मे २०२३ मध्ये लग्नबंधनात अडकला. दत्तूने गुपचूप कोर्ट मॅरेज करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. दत्तूची होणारी बायको फिल्म इंडस्ट्रीतील नाही. ती पेशाने डॉक्टर असून ती स्त्रीरोग तज्ञ असून तिचं पुण्यात स्वत:चं क्लनिक आहे. दत्तूच्या बायकोचं नाव स्वाती घुनागे असं आहे. स्वाती ही डॉक्टर असल्याबरोबरच अनेक सामाजिक कार्यातही सक्रीय आहे.