(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीने काल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने चित्रपटांमधून ब्रेक घेण्याबाबत सांगितले. त्याच्या या निर्णयाने त्याच्या चाहत्यांनाही आश्चर्य वाटले असून 12वी फेल अभिनेत्याने हा निर्णय का घेतला? असे प्रश्न त्यांना पडले आहेत. सोशल मीडियावर काही लोक अभिनेत्याच्या या निर्णयाचे समर्थन करत आहेत, तर काही लोक याला पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत. दुसरीकडे, विक्रांत मेस्सीने चित्रपटांपासून ब्रेक जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. अभिनेता काय म्हणाला जाणून घेऊयात?
चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग
वास्तविक, काल संसदेच्या बालयोगी सभागृहात विक्रांत मेस्सीच्या ‘द साबरमती रिपोर्ट’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक खासदार चित्रपट पाहण्यासाठी आले होते. चित्रपट पाहिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर एका पोस्टद्वारे विक्रांत मेस्सीच्या चित्रपटाचे कौतुक केले.
काय म्हणाला अभिनेता?
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘साबरमती रिपोर्टच्या निर्मात्यांच्या प्रयत्नांसाठी मी त्यांचे कौतुक करतो.’ यादरम्यान अभिनेता म्हणाला, ‘मी हा चित्रपट पंतप्रधान आणि सर्व कॅबिनेट मंत्री आणि खासदारांसोबत पाहिला आहे. तो खूप वेगळा अनुभव होता. मी माझ्या शब्दात ते व्यक्त करू शकत नाही कारण मी खूप आनंदी आहे.’
#WATCH | Delhi: After watching his film ‘The Sabarmati Report’ with Prime Minister Narendra Modi, actor Vikrant Massey says, “I watched the film with Prime Minister and all cabinet ministers and many MPs. It was a special experience. I will still not be able to express it in… pic.twitter.com/htzbo6ayaJ
— ANI (@ANI) December 2, 2024
विक्रांत मेस्सी पुढे म्हणाला, ‘साबरमती रिपोर्ट हा माझ्या करिअरचा शिखरबिंदू आहे, कारण मला पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चित्रपट पाहण्याची संधी मिळाली.’ असे अभिनेता म्हणाला. विक्रांत मेस्सीने त्याच्या एका पोस्टमध्ये म्हटले होते की तो 2025 मध्ये दोन चित्रपटांसह शेवटचा दिसणार आहे.
कंगना रणौतने केले कौतुक
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतनेही चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी चित्रपटाचे कौतुक केले आणि सर्वांना तो पाहण्याची विनंती केली. याचदरम्यान, ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट गेल्या महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 2002 मध्ये घडलेल्या गोध्रा घटनेवर आधारित आहे.