दोन वर्षातच पहिलं लग्न मोडलं, दुसऱ्या लग्नानंतर पुन्हा आई होणार लोकप्रिय टिव्ही अभिनेत्री, व्हिडीओ शेअर करत दिली 'गुड न्यूज'
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि टेलिव्हिजन अभिनेत्री सौम्या शेठबद्दल एक महत्वाची बातमी समोर येत आहे. सौम्या हिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अमेरिकेत स्थायिक झाली. काही वर्षांपूर्वीच फिल्म इंडस्ट्रीला राम राम ठोकणारी सौम्या शेठ लवकरच आई होणार आहे. सौम्या सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सौम्या आता लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. अडीच वर्षांपूर्वी दुसरं लग्न करणारी सौम्या आता पुन्हा गरोदर राहिली आहे. सौम्याला तिच्या पहिल्या लग्नापासून एक मुलगा आहे. अभिनेत्रीने ही ‘गुड न्यूज’ चाहत्यांना इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत दिली आहे. अभिनेत्रीवर सध्या चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
‘नव्या’या टेलिव्हिजन शोमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सौम्या आता इंडस्ट्रीपासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. सौम्या काही वर्षांपूर्वी भारतातून अमेरिकेमध्ये स्थायिक झाली आहे. ती अमेरिकेत मुलगा आणि पतीसोबत राहते. सौम्याने चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. लवकरच ती आई होणार आहे. तिने काही महिन्यांपूर्वीच दुसरं लग्न केलं होतं. आता त्या लग्नातून तिला पहिलं बाळ होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सौम्या जुलै २०२५ मध्ये दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. अभिनेत्रीने दोन वर्षांपूर्वीच शुभम चुडियाशी लग्न केले आहे. तो पेशाने फॅशन डिझायनर आहे. तर सौम्या पेशाने रिअल इस्टेटमध्ये व्यवसाय करतेय.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये सौम्या, तिचा पती आणि तिचा पहिला मुलगा हे तिघंही एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. “आमच्याकडे शेअर करण्यासाठी एक बातमी आहे…” असं म्हणत अभिनेत्रीने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. सौम्याने २०१५ मध्ये अरुण कुमारशी अमेरिकेत लग्न केलं होतं. पण तिला कौटुंबिक हिंसाचार आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. २०१७ मध्ये गरोदर असतानाच तिने घटस्फोट घेतला. आयुष्यात घडलेल्या या घटनांमुळे सौम्याच्या मनात आत्महत्येचा विचार येत होता. पण तिला तिच्या आई-वडिलांनी सांभाळलं आणि त्यातून बाहेर पडण्यास मदत केली. सौम्याने जून २०२३ मध्ये शुभम चुहाडियाशी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. आता सौम्या आणि शुभम आई-बाबा होणार आहेत.