गोविंदाच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान गमावला जवळचा व्यक्ती, ओक्साबोक्षी रडूही आवरेना Video Viral
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता गोविंदा कमालीचा चर्चेत आला आहे. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिनेत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याचा सेक्रेटरी शशी प्रभू यांचं निधन झालं आहे. सेक्रेटरी आणि आपल्या जवळच्या मित्राला अखेरचा निरोप देत असताना अभिनेता खूपच भावूक झाला होता. त्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्याच्या सेक्रेटरीचं निधन ६ मार्च रोजी (गुरूवारी) निधन झालं. त्यांच्यावर गुरुवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांना सेक्रेटरी शशी प्रभू यांच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. शशी प्रभू हे केवळ गोविंदाचे सेक्रेटरीच नव्हते तर त्यांच्यात मैत्रीपूर्ण आणि घरच्यासारखे संबंध होते. अभिनेत्याला आपल्या मित्राच्या अंत्यसंस्कारावेळी अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर झाले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेता भावूक झालेला व्हिडिओ ‘विरल भयानी’च्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे. शशी प्रभू यांना अखेरचा निरोप देताना गोविंद अभिनेता ओक्साबोक्षी रडत होता. अभिनेत्याला जवळच्या मित्राला अखेरचा निरोप देताना गहिवरून आले.
अभिनेत्याचा सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर गोविंदाच्या चाहत्यांनीही अभिनेत्याच्या सेक्रेटरीला श्रद्धांजली वाहिली. एका युजरने कमेंट करत लिहिले की, देव शशी यांच्या आत्म्याला शांती देवो. दुसऱ्याने ओम शांती लिहिले. तर, अनेकांनी लिहिले की, सेक्रेटरी प्रभू हे गोविंदाच्या यशात पाठीशी कसे उभे राहिले, प्रत्येक कठीण काळात त्यांनी अभिनेत्याला साथ दिली. शशी प्रभू आणि गोविंदा यांच्यातील संबंध केवळ व्यावसायिकच नव्हते, तर वैयक्तिक आयुष्यातही त्यांच्यात चांगले नाते होते. दोघांमध्ये खूप चांगली मैत्री होती आणि बॉलिवूडमधील त्याच्या प्रवासात ते अभिनेत्याचे आधारस्तंभ होते. गोविंदाचे दुसरे सेक्रेटरी शशी सिन्हा यांनीही अभिनेते आणि शशी प्रभू यांच्यातील नात्याबद्दल भाष्य केले.
दरम्यान, शशी प्रभू यांच्या पार्थिवावर गुरुवारी रात्री १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. गोविंदाने सेक्रेटरीच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. गोविंदाचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही भावुक झाले आहेत.