फोटो सौजन्य: Instagram
आजकाल चित्रपट आणि वेब सिरीजेसमध्ये अभिनेत्री सई ताम्हाणकरचं नाव आघाडीवर आहे. सईने हिंदी वेब सिरीजेसोबतच मराठी सिरीज “मानवत मर्डर्स” मध्ये देखील आपला उत्कृष्ट अभिनय सादर केला होता. आता तिची नवीन वेब सिरीज “डब्बा कार्टेल” प्रदर्शित झाली आहे, ज्यामध्ये सई सोबत शबाना आझमी, शालिनी पांडे, गजराज राव आणि इतर अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. “डब्बा कार्टेल” सिरीजमध्ये सईचा अभिनय आणि तिचं पात्र विशेष चर्चेत आहे. या सिरीजमुळे तिचं नाव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर करीत आहे. याशिवाय, आयएमडीबीवरील लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत सई ताम्हाणकरने आघाडीचं स्थान मिळवले आहे. तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली आहेत, आणि सई एक उत्तम अभिनेत्री म्हणून आपलं स्थान पक्कं करत आहे.
या आठवड्यातील आयएमडीबीवर लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत आघाडीचे स्थान प्राप्त करण्याची सई ताम्हणकरची इच्छा पूर्ण झाली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये सईने आयएमडीबीशी इन्स्टाग्रामवरून संपर्क साधला होता. ती आयएमडीबीवरील लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या मानांकनाबद्दल उत्सुक होती. जेव्हा तिला कळले की ही यादी आयएमडीबीच्या जगभरातील कोट्यवधी ग्राहकांच्या सहभागावर आधारित असते, तेव्हा तिने यादीत स्थान मिळवण्याचा दृढ निश्चय व्यक्त केला. 3 मार्च 2025 रोजी सईची ही इच्छापूर्ती झाली.
बिग बॉसच्या घरातील सदस्याची जुळून आल्या रेशीमगाठी! अनुराग-रितिकाचं जमलंय हा…
‘डब्बा कार्टेल’ या तिच्या नव्या वेब सीरिजच्या प्रदर्शनानंतर भारतातील सर्वात लोकप्रिय सेलेब्रिटींच्या यादीत सईने 23वे स्थान प्राप्त केले. ती म्हणाली, “मला महिन्यातून दोनदा आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत येण्याचा आनंद आहे. मी हे स्वतः दाखवले होते आणि ते घडताना पाहणे खूप रोमांचक आहे. आयएमडीबी ही अशी गोष्ट आहे ज्याचा मी सतत स्वतः उल्लेख करते. प्रेक्षकांच्या प्रेमातून हेच उत्पन्न होते हे समजून घेणे हे खूपच खास आहे.”
सईने अग्निमध्येही भूमिका साकारली आहे. यात तिने प्रतीक गांधी आणि दिव्येंदू शर्मासोबत तर भक्षकमध्ये भूमी पेडणेकर व संजय मिश्रा या कलाकारांसोबत काम केले आहे. आयएमडीबीच्या अँड्रॉइड व आयओएस ॲपवर पॉप्युलर इंडियन सेलिब्रिटी हे फीचर उपलब्ध आहे. या फीचरमध्ये दर आठवड्याला टॉप ट्रेंडिंग भारतीय एंटरटेनर व फिल्ममेकरवर प्रकाश टाकण्यात येतो. प्रत्येक महिन्यात आयएमडीबीला जगभरातून दिल्या जाणाऱ्या 25 कोटींहून अधिक भेटींवर हे आधारित असते. दर आठवड्याला कोण ट्रेंडिंग आहे हे एंटरटेनमेंटचे चाहते जाणून घेऊ शकतात, त्यांच्या आवडत्या एंटरटेनरला फॉलो करू शकतात आणि नव्या टॅलेंटविषयी जाणून घेऊ शकतात.