पत्नीच्या मैत्रिणीशीच जुळलं बोनी कपूरचं सूत, जाणून घ्या बोनी कपूर आणि श्रीदेवीची लव्हस्टोरी
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांचा ११ नोव्हेंबर १९५५ रोजी जन्म झाला. बोनी कपूर आज ६९ वा वाढदिवस साजरा करत आहे. बोनी कपूर यांनी आपल्या फिल्मी करियरमध्ये, ‘मिस्टर इंडिया’, ‘नो एंट्री’, ‘जुदाई’ आणि ‘वॉन्टेड’सह अनेक सुपरहिट चित्रपट दिले. बोनी कपूर आपल्या फिल्मी लाईफमुळे चर्चेत राहिले नाही तर त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही ते चर्चेत राहिले. आज बोनी कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल…
बोनी कपूर यांनी १९८३ मध्ये बॉलिवूड पदार्पण केले. मात्र त्यांना ओळख दिली ती, ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत, अनिल कपूर आणि श्रीदेवी होते. या चित्रपटापासूनच बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्यातील जवळीक वाढली. बोनी कपूर विवाहित होते, तरीही ते श्रीदेवीच्या प्रेमात पडले होते. खरंतर, बोनी कपूरची पहिली पत्नी मोना शौरी आणि श्रीदेवी यादोघीही खूप चांगल्या मैत्रिणी होत्या, ही गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे.
हे देखील वाचा – घटस्फोटावर ईशा कोप्पिकरचं पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, “मी तयार नव्हते पण त्याने…”
बोनी कपूर यांना पहिल्या पत्नीपासून अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर अशी दोन मुलं होती. त्याचवेळी बोनी कपूर आणि मोना शौरी यांच्या वैवाहिक आयुष्यात श्रीदेवीची एन्ट्र झाली आणि तिने बोनी आणि मोना यांचा संसार मोडला. जेव्हा बोनी आणि मोना यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू होत्या, त्यावेळी श्रीदेवी इंडस्ट्रीमध्ये स्वत:ला स्थिरावण्यासाठी संघर्ष करत होती. इतकं असलं तरीही मोना यांनी श्रीदेवीसाठी त्याकाळात त्यांच्या घरी राहण्याची सोय करून दिली होती. याकाळात श्रीदेवीने बोनी कपूर यांना राखी देखील बांधली होती. मात्र, काही दिवसांच्या ओळखीनंतर बोनी आणि श्रीदेवी यांचे सूत जुळले.
१९८७ मध्ये रिलीज झालेल्या, ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाच्या सेटवरच बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची लव्हस्टोरी सुरू झाली. प्रेमात पडल्यानंतर काही दिवसांनंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना प्रपोज केला. मात्र, याचा राग श्रीदेवीला आला. त्यानंतर नऊ महिने श्रीदेवी यांनी बोनी कपूर यांच्यासोबत बोलणं सोडून दिलं. पण, एकदा श्रीदेवीची आई आजारी पडली, तेव्हा बोनी यांनी न सांगता खूप मदत केली. त्यानंतर चार वर्षांनंतर अखेर श्रीदेवीने बोनी कपूर यांच्या प्रेमाला होकार दिला. मात्र, बोनी कपूर यांचे लग्न झाले होते, त्यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला त्यावेळी घटस्फोट दिला नव्हता. १९९६मध्ये बोनी यांनी पहिली पत्नी मोना कपूरला घटस्फोट दिला आणि अभिनेत्री श्रीदेवीशी लग्न केले.