महाराष्ट्रातल्या घराघरात प्रसिद्ध झालेली ‘आई कुठे काय करते’ मालिका प्रेक्षकांचा येत्या ३० नोव्हेंबरपासून प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तुम्हाला माहितीये का मालिकेतील तुमचे आवडते कलाकार एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?
Aai Kuthe Kay Karte Star Cast
टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर राहिलेली, प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेली ‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
या मालिकेने प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन केले. ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. शिवाय मालिकेतील कलाकारही... मालिकेसाठी कलाकारांना किती मानधन मिळायचे तुम्हाला माहितीये का ?
मीडिया रिपोर्टनुसार, अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी गोखलेला एका एपिसोडसाठी २५,००० इतकं मानधन मिळत होते. तर अनिरुद्धची भूमिका साकारणाऱ्या अभिनेते मिलिंद गवळी एका एपिसोडसाठी २०,००० इतकं मानधन घेतात.
तर खलनायिका संजनाचं पात्र साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले १७,००० इतकं मानधन एका एपिसोडसाठी घेते. तर आशुतोषची भूमिका साकारणाऱ्या ओमकार गोवर्धनला १८,००० इतकं एका एपिसोडसाठीचं मानधन मिळायचं.
अरूंधतीच्या मोठ्या सुनाचे पात्र साकारणाऱ्या आश्विनी महांगडेला एका एपिसोडसाठी १६,००० मानधन मिळायचे. तर मोठ्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या निरंजन कुलरकर्णीला १४,००० इतकं एका एपिसोडसाठीचं मानधन मिळायचं.
अरुंधतीची मुलगी ईशाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अपूर्व गोरे हिला एका एपिसोड १०,००० रुपये मानधन मिळायचं. तर अरुंधतीचा लाडका मुलगा यशची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अभिषेक देशमुख याला एका एपिसोडसाठी १२,००० रुपये मानधन मिळत होतं.
तर, मालिकेत अनिशची भूमिका साकारणारा अभिनेता सुमंत ठाकरे याला एका एपिसोडसाठी ७००० रुपये मानधन मिळत होतं.