फिर से ठोको ताली...! नवज्योत सिंह सिद्धू यांची The Great Indian Kapil Show मध्ये पुन्हा एन्ट्री, Video Viral
टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) आता ओटीटीवर सुरू झाला आहे. ओटीटीवर सुरु झालेल्या शोचं नाव ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ (The Great Indian Kapil Show) असं आहे. सध्या ओटीटीवर या शोचा दुसरा सीझन सुरू आहे. आता दुसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षकांना फार मोठं गिफ्ट मिळणार आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये अर्चना पूरन सिंगच्या खुर्चीवर नवज्योत सिद्धू बसलेले दिसत आहेत. त्यांना पाहून फक्त चाहतेच नाही तर, कपिल शर्माही हैरान झाला आहे. नवीन प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामुळे हा शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये पुन्हा एकदा नवजोत सिंह सिद्धूची एन्ट्री झालेली पाहायला मिळाली आहे. शोमध्ये नवजोत सिंह सिद्धू आणि त्यांची पत्नी नवजोत कौर सिद्धू देखील हजेरी लावणार आहेत. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या प्रोमोमध्ये समोरील खुर्चीवर अर्चना पूरन सिंहच्या ऐवजी नवजोत सिंह सिद्धू बसल्याचं दिसत आहे. यावेळी नवज्योत सिंग सिद्धू यांना पाहून कपिल शर्मालाही विश्वास बसत नाही. शोमध्ये कपिलला वाटतं की, सुनील ग्रोवर नवजोत सिद्धू यांच्या गेटअपमध्ये खुर्चीवर बसला आहे.
नवजोत सिंह सिद्धू बोलायला सुरुवात करतात, तर कपिल शर्माला मोठा धक्का बसतो. अर्चना पूरन सिंग यांच्या खुर्चीवर दुसरं तिसरं कोणी नाही तर, नवजोत सिंग सिद्धूच बसलेले असतात. यावेळी अर्चना पूरन सिंह कपिल शर्माजवळ येते आणि बोलते की, सरदार साहेबांना उठायला सांग. माझ्या खुर्चीवर कब्जा करुन बसले आहेत. द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोमध्ये माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि त्याची पत्नी गीता बसराही दिसत आहे. हे सुद्धा शोमध्ये उपस्थिती लावणार आहेत.
हे देखील वाचा – फिल्म इंडस्ट्री सोडणाऱ्या किरण मानेला ‘या’ अभिनेत्याने दिली होती कठीण काळात साथ
शोमध्ये आल्यानंतर हरभजन एक शायरी म्हणाला, त्याच्या शायरीने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. हरभजन सिंह म्हणतो, “दुनिया कुछ भी कहें, किसी के कहने से कोई बुद्धू नहीं बन जाता, कुर्सी पर कोई भी बैठ जाये, कोई सिद्धू नही बन जाता…” दरम्यान सोशल मीडियावर नवजोत सिंग सिद्धू परतणार असल्याच्या चर्चा होत आहे.