मुनव्वर फारुकीच्या मुलाला झालाय 'हा' गंभीर आजार, अभिनेत्याने सांगितला कठीण काळातला किस्सा
प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आणि ‘बिग बॉस ओटीटी २’चा विनर मुनव्वर फारूकी कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतो. अशातच सध्या अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेता कायमच त्याचे खासगी आयुष्य लाईमलाईट पासून दुर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. नुकतंच अभिनेत्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने मुलगा मिकाईलबाबतीत मोकळेपणाने सांगितले. एका गंभीर आजाराने तो त्रस्त असल्याचे त्याने सांगितलेय. त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याच्याकडे पैसेही नव्हते आणि या आजाराबद्दलचे उपचार खूप महाग असल्याचेही त्याने मुलाखतीत सांगितले.
अखेर शशांक केतकरच्या प्रयत्नांना यश, BMC ला धन्यवाद तर दिले पण मारला एक पुणेरी टोमणा!
एका पॉडकास्टमध्ये मुनव्वरने मुलाखती दरम्यान सांगितले की, “मुलगा मायकलला ‘कावासाकी’ (Kawasaki) नावाचा एक विचित्र गंभीर आजार झाला आहे. ज्यावेळी आम्हाला या गंभीर आजाराचे निदान झाले त्यावेळी आमच्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसे देखील नव्हते. या घटनेचा माझ्या आणि माझ्या फॅमिलीच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला आहे. आम्हाला सर्वांना या काळात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. माझ्या मुलाची एकदा खूप तब्येत बिघडली होती, तेव्हा तो अवघ्या दीड वर्षांचाच होता. पहिल्या २ ते ३ दिवसांत त्याची तब्येत सुधारतच नसल्यामुळे आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं.”
मुलाला ‘कावासकी’ आजाराचे निदान केव्हा झाले ?
मुलाखतीमध्ये अभिनेत्याने पुढे सांगितले की, “त्याला आम्ही हॉस्पिटलमध्ये नेलं. नेल्यानंतर आम्हाला डॉक्टरांनी काही टेस्ट करायल्या दिल्या त्यामध्ये त्याला ‘कावासाकी’ आजाराचे निदान झाल्याचे सांगितले. डॉक्टरांनी आम्हाला त्या आजाराच्या उपचारासाठी तीन इंजेक्शन सांगितले होते. त्याच्या एका इंजेक्शनची किंमत तब्बल २५,००० इतकी होती. त्यावेळी माझ्याकडे केवळ ७०० ते ८०० च रुपये होते. आणि डॉक्टरांना या तीन इंजेक्शनसाठी ७५ हजार रुपयांची गरज होती, त्यामुळे मी खूप अस्वस्थ होतो.” मुलाखती दरम्यान मुनव्वरने सांगितले की, डॉक्टरांसोबत बोलताना मी संपूर्णपणे शांत झालो होतो. तेव्हा मी डॉक्टरांनी पैसे तुम्हाला देतो असं आश्वासन दिलं होतं. मी बाहेर आल्यानंतर अनेक वेळ निश्चित पडून राहिलो होतो. हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता.
मुलाची अवस्था आणि पैशांच्या कमतरतेमुळे मुनव्वर फारूकी दु:खी झाला होता, परंतु तो स्वतःला परिस्थितीतून कशा पद्धतीने बाहेर काढता येईल, याचा अधिकाधिक प्रयत्न करत होता. मुलाच्या आजारपणाच्या काळात मुनव्वरने पूर्वी काम करत असलेल्या ठिकाणाहून कर्ज घेतलं होतं. मुंबई सेंट्रलला जाऊन तीन तासात मुनव्वर पैसे घेऊन रुग्णालयात परत आला होता. उपचाराचा खर्च पूर्ण झाला होता पण मुनव्वरच्या पाठी असलेली लेकाची काळजी काही कमी व्हायचं नाव घेत नव्हती. मुलगा आजारी पडलेल्या दिवसांत माझे हसू गायब झाले होते, असं अभिनेत्याने मुलाखतीत सांगितलं होतं. कारण त्याच्यासाठी विषय फक्त पैशाचा नव्हता तर त्याच्या मुलाच्या आयुष्याचा होता.
कावासाकी आजाराची लक्षणं
लक्षणे सामान्यत: टप्प्याटप्प्याने दिसतात. या आजाराचं पहिलं लक्षण म्हणजे, ताप. सलग पाच दिवस जर शरीरातला ताप कमी होत नसेल तर, या आजारातील पहिलं प्रमुख लक्षण आहे. दुसरे लक्षण म्हणजे, मुलांच्या छातीवर किंवा पोटावर पुरळ उठू शकते. शिवाय डोळेही लाल होतात आणि मुलाच्या गळ्या भोवती गाठ निर्माण होते. लहान मुलांचे ओठ, जीभ आणि हात कोरडे पडून लाल होतात आणि शरीरावर अनेक ठिकाणी रॅशेस निर्माण होतात. मुलाची पचन क्षमता कमजोर पडते. त्याचा रक्तदाब सुद्धा वेगाने कमी होऊ लागतो आणि ब्लड वेसेल्स मध्ये सुद्धा सूज निर्माण होते. लहान मुलांच्या हातावर आणि पायावर सूज निर्माण होते. यामुळे त्यांना हाताची मुठ आवळण्यास आणि चप्पल घालण्यास सुद्धा समस्या निर्माण होते.
कावासाकी आजार कसा होतो?
जाणकारांचे म्हणणे आहे की याबद्दल अजून काही थोड पुरावे उपलब्ध झालेले नाहीत जे सांगू शकतील की मुलांना हा कावासाकी रोग कसा होत आहे. आतापर्यंत या आजारावर कोणता उपचार देखील उपलब्ध नाही आणि ना हा आजार ओळखण्याची काही चाचणी आहे. त्यामुळे या आजारांपासून मुलांना दूर ठेवायचे असेल तर शक्य तितकी त्यांची काळजी घ्या. त्यांना बाहेर जाऊ देऊ नका आणि स्वच्छता राखायला सांगा.
बिग बॉसने केली प्रेक्षकांची फसवणूक, या आठवड्यात एव्हिक्शनचे नियम बदलले