फोटो सौजन्य - सोशल मीडिया
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ची प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या प्रीमियरवेळी ४ डिसेंबर रोजी (मंगळवार) हैद्राबादमधल्या एका थिएटरमध्ये प्रेक्षकांची फार मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यामुळे चेंगराचेंगरी झाली होती. या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला असून एक लहान मुलगा गंभीर जखमी आहे, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर अभिनेता अल्लू अर्जुनसह त्याच्या सिक्युरिटी एजन्सीवर आणि थिएटर प्रशासनाच्या विरोधात पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या संपूर्ण दुर्घटनेनंतर आता अल्लू अर्जुनने त्यावर दु:ख व्यक्त केलं आहे. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेच्या कुटुंबीयाला आर्थिक मदतीचं आश्वासन दिलं आहे.
बिग बॉसने केली प्रेक्षकांची फसवणूक, या आठवड्यात एव्हिक्शनचे नियम बदलले
प्रीमियरवेळी ४ डिसेंबर रोजी अल्लू अर्जुन हैद्राबादमधल्या संध्या थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला असून महिलेचा मुलगा गंभीर जखमी झाला. मृत महिलेचे पती मोगदमपल्ली भास्कर यांनी ‘ईटाईम्स’शी बोलताना आपल्या पत्नीच्या मृत्यूचे कारण अल्लू अर्जुनला जबाबदार धरले आहे. अल्लू अर्जुन आणि त्याची टीम त्याला माहिती देऊन थिएटरमध्ये आली असती तर ना त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला असता, ना माझ्या मुलाची अशी अवस्था झाली असती, असं तो मुलाखतीदरम्यान म्हणाला.
Deeply heartbroken by the tragic incident at Sandhya Theatre. My heartfelt condolences go out to the grieving family during this unimaginably difficult time. I want to assure them they are not alone in this pain and will meet the family personally. While respecting their need for… pic.twitter.com/g3CSQftucz
— Allu Arjun (@alluarjun) December 6, 2024
घटनेनंतर अभिनेता अल्लू अर्जुनसह त्याच्या सिक्युरिटी एजन्सीवर आणि थिएटर प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर अल्लू अर्जुनने X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो म्हणतोय की, मी महिलेच्या कुटुंबाला वैयक्तिकरित्या जाऊन भेटणार आहे. या कठीण काळात त्या महिलेचे कुटुंब एकटे नाही. मी त्यांच्या पाठीशी उभा आहे. माझ्याकडून वैयक्तिक रित्या या कुटुंबाला जी काही मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न करेल, असं अभिनेता म्हणाला आहे. मी त्या मृत महिलेच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची भरपाई देणार आहे. शिवाय त्या मुलाचा उपचार आणि औषधांचा सर्व खर्चही मी उचलणार आहे, असंही अभिनेता म्हणाला.
‘पुष्पा 2’ ने बनवले 11 रेकॉर्ड्स, अल्लू अर्जुनने रचला इतिहास
थिएटरमध्ये घडलेल्या घटनेनंतर मृत महिलेच्या कुटुंबीयांनी चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. भारतीय न्याय संहिता अधिनियमाच्या कलम 3(5) सह कलम 105 आणि 118(1) नुसार अभिनेता अल्लू अर्जुनसह त्याच्या सिक्युरिटी एजन्सीवर आणि थिएटर प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेंट्रल झोनचे डीसीपी अक्षांश यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, थिएटर मॅनेजमेंट, अल्लू अर्जुन आणि त्याच्या सिक्युरिटी टीमवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्याच्या सेक्युरिटी टीममध्ये कोणकोणते गार्ड होते, जमावाला कोणी ढकलले, ज्यामुळे ही परिस्थिती उद्भवली यासंपूर्ण घटनेचा आम्हाला अभ्यास करायचा आहे. शिवाय संपूर्ण घटनेची व्यवस्थित चौकशीही करायची आहे. पोलिसही घटनास्थळी तैनात होते. पोलिसांकडून कोणतीही चूक झालेली नाही. दरम्यान, संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे.