'हिरामंडी'तील आलमजेब होणार लवकरच आई, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी बनणार आजोबा
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हिरामंडी:द डायमंड बाजार’ ही वेबसीरीज गेल्या वर्षी नेटफ्लिक्स या ओटीटीवर रिलीज झाली होती. या वेबसीरीजच्या माध्यमातून कलाकारांसह दिग्दर्शकांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळालीये. या वेबसीरीजमध्ये, आलमजेबचं पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री सध्या प्रकाशझोतात आली आहे. अभिनेत्री शर्मिन सेहगल सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रकाशझोतात आली आहे. शर्मिनने चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली असून ती लवकरच एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे.
“दारूच्या व्यसनाने त्याला संपवलं…” Ex पतीच्या निधनानंतर अभिनेत्री शुभांगी अत्रेची पहिली प्रतिक्रिया
प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माते संजय लीला भन्साळी यांची शर्मिन ही भाची आहे. लवकरच संजय भन्साळी सुद्धा आजोबा होणार आहेत. शर्मिन लवकरच आई होणार असल्याच्या बातमीने चाहते आनंदित झाले असून लवकरच तिच्या घरी आता पाळणा हलणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शर्मिन सेहगल सध्या तिच्या गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात आहे आणि तिची लवकरच प्रसूती होईल. शर्मिन सेहगल आई होणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध पत्रकार विकी लालवानी यांनी दिले आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीच्या चाहत्यांना माहिती दिली आहे.
इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत विकी लालवानी म्हणाले की, भन्साळी आणि सहगल कुटुंबाच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. शर्मिन सेहगल लवकरच आई होणार आहे. पत्रकाराच्या ह्या बातमीने चाहत्यांकडून शर्मिनवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शर्मिन सहगल गरोदरपणामुळे अभिनयापासून दूर आहे. शर्मिनची आई होण्याची ‘गोड बातमी’ देताना, कुटुंबाच्या जवळील एका व्यक्तिने सांगितले की, शर्मिन आई झाल्यानंतर ती लवकरच कामावर परतेल. नोव्हेंबर २०२३मध्ये तिने लंडनमध्ये उद्योगपती अमन मेहतासोबत लग्न केले. लग्नानंतर ती अहमदाबादमध्ये स्थायिक झाली. लग्नाच्या दीड वर्षानंतर, शर्मिन आणि अमन त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहेत.
“हे TRP वाढवण्याचं साधन नाही…”; पहलगाम हल्ल्यावरून अभिनेत्री शिवानी सुर्वे प्रसारमाध्यमांवर संतापली