१ जूनपासून 'या' दोन राज्यांमध्ये चित्रपटगृहे बंद होऊ शकतात, नेमकं कारण काय ?
बाकी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याची मजा काही औरच आहे. पण अनेकदा आपण थिएटरमध्ये असलेल्या चित्रपटांच्या तिकीटांचे अव्वाच्या सव्वा दर पाहून अनेकजण घरी बसून टीव्हीवर, मोबाईलवर चित्रपट पाहणं पसंत करतात. तर क्वचितच लोकं थिएटरमध्ये चित्रपट पाहायला जातात. याच सर्व प्रश्नांवर तोडगा म्हणून कर्नाटक सरकारने तिथल्या प्रेक्षकांसाठी जबरदस्त उपाय काढला आहे. आता लवकरच कर्नाटक राज्यातील लोकं थिएटरमध्ये जाऊन गर्दी करताना दिसणार आहेत. कारण, तिथल्या राज्य सरकारने चित्रपटांच्या तिकीटदरांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
BIGG BOSS OTT 3 विजेती अभिनेत्री देतेय ‘या’ गंभीर आजाराशी झुंज, म्हणाली, “माझ्या शरीरातील पेशी…”
कर्नाटक सरकारने शुक्रवारी (७ मार्च) रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील सर्व सिंगल स्क्रीन थिएटर असो किंवा मल्टीप्लेक्समधील तिकीटाचे दर निश्चित करण्यात आले आहे. कर्नाटकात जर तुम्हाला आता कोणताही चित्रपट पाहायचा असेल तर तोही फक्त २०० रुपयांमध्ये पाहता येणार आहे. तुम्ही कोणत्याही चित्रपटाचं तिकिट घ्या त्याची किंमत ही फक्त २०० रुपये किंवा त्याहून कमी असणार आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारनं शुक्रवारी (७ मार्च) चित्रपटप्रेमींसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. कर्नाटक सरकारने घेतलेल्या निर्णयाचे मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या कलाकारांनी कौतुक केले आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्याने खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केलीये.
रश्मिका मंदानाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस आमदाराची सारवासारव, काय म्हणाले रवी कुमार
प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने कर्नाटक सरकारचं कौतुक केलं आहे. अभिनेत्याने हे कौतुक खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत केलेलं आहे. हेमंत ढोमेने ट्वीट करत महाराष्ट्र राज्य सरकारलाही मराठी चित्रपटांबाबत अशा प्रकारचा निर्णय घेण्याची विनंती केली आहे. पोस्टमध्ये अभिनेत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग केलं आहे. शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अभिनेता हेमंत ढोमे म्हणतो,
“कर्नाटक सरकारचा ऐतिहासिक निर्णय!
कर्नाटक या आपल्या शेजारच्या राज्याने आज एक अत्यंत महत्तवाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे!
सर्वच्या सर्व सिनेमागृहात चित्रपटाच्या तिकिटांची किंमत ही जास्तीत जास्त २०० रुपये इतकी मर्यादित असणार!
आपल्या भाषेतला चित्रपट मोठा व्हावा यासाठी उचलेलं हे एक अत्यंत महत्त्वाचं आणि संपूर्ण देशाला मार्गदर्शक असं पाऊल ठरणार आहे!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या दोघांकडून अशाच निर्णयाची अपेक्षा मी एक प्रेक्षक म्हणून सगळ्यात आधी करतो आणि त्या नंतर मराठी भाषा आणि आपल्या भाषेतील चित्रपटांच्या भवितव्या करिता सिनेमागृहांच्या मनमानी कारभाराला आपण आळा घालाल हिच इच्छा!
महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना स्क्रीन्स उपलब्ध होणं त्यांना प्राईम टाईम मिळणं यासाठी आता कायदा करण्यात यावा! महाराष्ट्रात मराठीलाच प्राघान्य हवं!
शिवाय महाराष्ट्रात सगळ्याच चॅनल्स आणि OTT प्लेटफार्मस ची कार्यालयं आहेत, तर कर्नाटक सरकार सारखं आपणही त्या सर्वांना मराठीला प्राधान्य देणे अनिवार्य करावे ही विनंती!
मला खात्री आहे आपलं सरकार मराठी साठी, मराठी चित्रपट व्यवसायासाठी लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचलेल!”