
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
“अवतार: फायर अँड अॅशेस” ने जगभरात चर्चा निर्माण केली आहे. जेम्स कॅमेरॉन दिग्दर्शित हा चित्रपट भारतात “धुरंधर” पेक्षा कमी कामगिरी करत असला तरी जगभरात या चित्रपटाने फक्त सहा दिवसांत रणवीर सिंगच्या चित्रपटाच्या चौपट कमाई केली आहे. व्हरायटीच्या मते, या चित्रपटाने जगभरात $४५० दशलक्ष कमाई केली आहे, म्हणजेच ₹४,०४२ कोटी चित्रपटाची कमाई झाली आहे. भारतातही हा चित्रपट स्थिर गतीने प्रगती करत आहे आणि ₹१ अब्ज क्लबमध्ये हा चित्रपट पोहचला आहे. २५ डिसेंबर, गुरुवारी ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन असल्याने, वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट ₹५,००० कोटींचा आकडा ओलांडेल असा अंदाज आहे.
“अवतार” फ्रँचायझीमधील या तिसऱ्या चित्रपटाचे बजेट अंदाजे ₹३,६०० कोटी आहे. परंतु, ते जेम्स कॅमेरॉनच्या २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अवतार २’ पेक्षा खूपच मागे आहे, ज्याने जगभरात ४९.६० कोटी रुपये कलेक्शन केले होते आणि भारतात ६ दिवसांत १७९.८० कोटी रुपये कलेक्शन केले जाणार आहे.
कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीत समाराचा दिला बदललेला लूक, आजी नीतू कपूरशी केली तुलना; पाहा Video
‘अवतार ३’ बॉक्स ऑफिस कलेक्शन
या साय-फाय चित्रपटाने अमेरिकेसह देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ११९ दशलक्ष डॉलर्स (१,०६८ कोटी रुपये) पेक्षा जास्त कमाई केली आहे. भारतात, सहा दिवसांत त्याने ९५.८० कोटी रुपयांची कमाई केली आहे. बुधवारी, भारतीय बॉक्स ऑफिसमध्ये मोठी उडी दिसून आली, सहाव्या दिवशी सर्व सहा भाषांमध्ये १०.३० कोटी रुपये कमावले. आदल्या दिवशी, चित्रपटाने ९.२५ कोटी रुपये कमावले आहेत. गुरुवारी, तो ख्रिसमसच्या सुट्टीचा फायदा घेताना दिसणार आहे आणि आरामात १०० कोटी रुपये पार करेल असे वाटत आहे.
ख्रिसमस ते १ जानेवारी पर्यंत ९०० कोटी रुपये कमाई करण्याचा अंदाज
“अवतार: फायर अँड अॅशेस” पुढील पाच ते सहा दिवसांत आणखी भरघोस कमाई करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. पाश्चात्य देशांमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे, २५ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान जगभरात ते सहजपणे ८००-९०० कोटी रुपये कमाई करेल असा अंदाज आहे. परंतु, या दरम्यान चित्रपटाला तीन नवीन चित्रपटांना टक्कर द्यावी लागणार आहे. टिमोथी चालमेटचा स्पोर्ट्स ड्रामा कॉमेडी “मार्टी सुप्रीम”, संगीत नाटक “सॉन्ग सुंग ब्लू” आणि “अॅनाकोंडा” हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
‘झूटोपिया २’ ने ११,६७७ कोटी रुपयांची केली कमाई
दरम्यान, डिस्नेचा अॅनिमेटेड सिक्वेल “झूटोपिया २” त्याच्या जागतिक बॉक्स ऑफिस यशाचे नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात १.३ अब्ज डॉलर्स (₹११,६७७ कोटी) कमाई केली आहे. ख्रिसमसपूर्वी बॉक्स ऑफिसवर ही एक महत्त्वाची कामगिरी आहे. तसेच आता “अवतार ३” किती कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.