(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
जगभरातील उत्कृष्ट संगीत आणि गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेले कोल्डप्ले भारतात आपला संगीत कार्यक्रम सादर करणार आहे. त्याच्या तिकिटांसाठीही खूप स्पर्धा आहे. त्याच वेळी, तिकिटांचा काळाबाजार आणि फसवणूकीच्या बातम्याही समोर येत आहेत. ज्यांना घरच्या आरामात हा संगीत कार्यक्रम पहायचा आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कोल्डप्ले डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे.. डिस्ने+ हॉटस्टार कोल्डप्लेच्या सहकार्याने त्यांचा आयकॉनिक ‘म्युझिक ऑफ द स्फेयर्स वर्ल्ड टूर कॉन्सर्ट’ भारतातील प्रेक्षकांसमोर थेट सादर करणार आहेत.
ख्रिस मार्टिनने उत्साह व्यक्त केला
कोल्डप्लेचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन यांनी भारतात सादरीकरण करण्याबद्दल उत्साह व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “भारतातील आमच्या सर्व मित्रांना नमस्कार. आम्हाला कळवण्यास आनंद होत आहे की २६ जानेवारी रोजी अहमदाबादमधील आमचा शो डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंग केला जाणार आहे, त्यामुळे तुम्ही तो भारतातील कुठूनही पाहू शकता. आम्हाला आशा आहे की तुम्ही आमच्यात सामील व्हाल.” तुमच्या सुंदर देशाला भेट देण्यासाठी आम्हाला खूप आनंद होत आहे. खूप प्रेम पाठवत आहे!”. असे लिहून त्यांनी हा आनंद व्यक्त केला आहे.
या दिवशी स्ट्रीम होणार आहे
कोल्डप्ले कॉन्सर्टचे थेट प्रक्षेपण २६ जानेवारी २०२५ रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर केले जाणार आहे. हॉटस्टारचा दावा आहे की लोकांना या संगीत कार्यक्रमाचा आनंद घेता यावा म्हणून त्याचे थेट प्रक्षेपण चांगल्या दर्जाचे केले जाईल. या बातमीने चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. आता Coldplay च्या चाहत्यांना हा आनंद घर बसल्या घेता येणार आहे. ज्याची उत्सुकता आता वाढली आहे.
पहिल्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या ‘इलू इलू’ चित्रपटाचा रंजक ट्रेलर प्रदर्शित
संगीत कार्यक्रमात हे नियम पाळावे लागतील
‘म्युझिक ऑफ द स्फेयर्स वर्ल्ड टूर’ दरम्यान, ब्रिटिश बँडने १८, १९ आणि २१ जानेवारी रोजी ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई परिसरातील डी वाय पाटील स्टेडियममध्ये तीन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कार्यक्रमादरम्यान मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या चंदीगडमधील एका रहिवाशाने केलेल्या तक्रारीनंतर, ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांनी १४ जानेवारी रोजी कॉन्सर्ट आयोजक, कोल्डप्ले फ्रंटमॅन ख्रिस मार्टिन आणि कार्यक्रमाचे तिकीट भागीदार बुकमायशो यांना नोटीस बजावल्या आहेत. या सूचनेनंतर, अशा कार्यक्रमांमध्ये आवाजाची पातळी १२० डेसिबलपेक्षा जास्त नसावी असा इशारा देण्यात आला. नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाईल असे देखील सांगण्यात आले आहे.