Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पूर्वी DVD विकणारी लहान कंपनी आता Warner Brothers ला घेणार विकत; Netflix चा मोठा करार

आधी नेटफ्लिक्स चित्रपटांच्या डीव्हीडी भाड्याने देणारी एक छोटी कंपनी होती. आणि आता ही ओटीटी किंग बनली असून, वॉर्नर ब्रदर्स ही कंपनी आता विकत घेत आहे. नेटफ्लिक्सने वॉर्नर ब्रदर्सला विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 10, 2025 | 12:53 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • DVD विकणारी कंपनी आता Warner Brothers ला घेणार विकत
  • Netflix च्या मोठ्या कराराने उडवली खळबळ
  • नेटफ्लिक्सला या कराराचा फायदा काय?
 

पंधरा वर्षांपूर्वी, वॉर्नर ब्रदर्स हे एक मनोरंजनासाठी प्रसिद्ध नाव होते आणि नेटफ्लिक्स तेव्हा एक छोटी कंपनी होती जी चित्रपटांच्या डीव्हीडी भाड्याने लोकांना विकत असे. तेव्हा कोणीतरी टाइम वॉर्नरचे तत्कालीन सीईओ जेफ बुक्स यांना विचारले की नेटफ्लिक्स तुमच्यासोबत करार करू शकते का? यावेळी बुक्स हसले. “हे असे विचारण्यासारखे आहे की अल्बेनियन सैन्य जग ताब्यात घेईल का?”. असे म्हणून त्याने नेटफ्लिक्स वर विनोद करून टीका केली.

त्याच बुक्सना आता हे ऐकून धक्का बसला असेल की लहान नेटफ्लिक्सने वॉर्नर ब्रदर्सला $82.7 अब्जमध्ये खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. परंतु, यादरम्यान त्यांची कंपनी आता आणखी मोठी झाली आहे, वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी (WBD) बनली आहे. त्यांच्याकडे HBO, एक प्रमुख प्रीमियम टीव्ही नेटवर्क आणि CNN आणि TNT असे दोन केबल टेलिव्हिजन नेटवर्क देखील आहेत. HBO ची स्ट्रीमिंग सेवा, मॅक्स, यांचा देखील यामध्ये समावेश आहे. स्पष्टपणे, जर हा करार मंजूर झाला तर नेटफ्लिक्स एका विशाल साम्राज्याचा सम्राट बदलेल. मनोरंजनाचा किंग म्हणून संबोधल्यानंतरही त्याचा धबधबा कायम राहील.

‘Overacting थांबवा ताई, ‘बिग बॉस’ संपले आता..’, तान्या मित्तलचा बदलला अंदाज; आधी पापाराझी आणि आता ड्रायव्हरलाही फटकारले

नेटफ्लिक्सला या कराराचा फायदा काय?

जर हा करार झाला, तर संपूर्ण वॉर्नर ब्रदर्स फिल्म स्टुडिओ – म्हणजे हॅरी पॉटर, डीसी सुपरहिरो, गेम ऑफ थ्रोन्स, फ्रेंड्स, स्ट्रेंजर थिंग्ज, सक्सेशन आणि द व्हाईट लोटस सारख्या आयकॉनिक फ्रँचायझी – थेट नेटफ्लिक्सच्या नियंत्रणाखाली येतील. ते आणखी एक प्रमुख फिल्म ब्रँड एचबीओ देखील विकत घेणार आहेत. वॉर्नर ब्रदर्सकडे सीएनएन आणि टीएनटी देखील आहे, परंतु नेटफ्लिक्सला त्यात रस नाही. त्याचे लक्ष पारंपारिक टीव्हीऐवजी डिजिटल, म्हणजेच ओटीटी प्लॅटफॉर्म आणि स्ट्रीमिंगवर असल्याचे दिसून आले आहे.

या करारात मनमानी होण्याची शक्यता

जर हा करार पूर्ण झाला तर, जागतिक स्ट्रीमिंग मार्केटमध्ये केवळ नेटफ्लिक्स ४० ते ४५ टक्के नियंत्रण मिळवेल. यामुळे मक्तेदारीचा मोठा प्रश्न निर्माण होतो. मक्तेदारीमुळे मनमानी देखील होण्याची शक्यता आहे. आता प्रेक्षकांना केवळ नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनद्वारे अधिकाधिक समृद्ध सामग्री उपलब्ध होणार आहे, परंतु भविष्यात सबस्क्रिप्शन दर वाढण्याची शक्यता देखील आहे.

‘हिंदू मुलगा आणि मुस्लिम सून…’, सुनील लहरीच्या मुलाने सारा खानसोबत केले लग्न; यूजर्सने सुरु केली Trolling

चित्रपट आणि मनोरंजनावर नियंत्रण

नेटफ्लिक्स, ओटीटी सारखे डिजिटल प्लॅटफॉर्म, थिएटरशी स्पर्धा करतो. जर मोठे चित्रपट ओटीटीकडे स्थलांतरित झाले तर हे चित्रपट इंडस्ट्रीसाठी मोठा धक्का ठरेल, जो अद्याप कोविड-१९ साथीच्या आजाराच्या परिणामातून अजूनही बाहेर आलेला नाही. हा करार आपण चित्रपट कसे पाहतो आणि पुढील दशकासाठी आपल्या मनोरंजनावर कोण नियंत्रण ठेवतो हे ठरवेल. हा कदाचित हॉलिवूडच्या इतिहासातील एक क्षण आहे, मोबाइल युगात नोकियासाठी स्मार्टफोनच्या आगमनासारखाच, आणि इंटरनेटवर शोध घेण्यासारखेच विशेषाधिकार त्याला मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Netflix with warner bros billion dollar deal how will affect you know everything

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 12:53 PM

Topics:  

  • entertainment
  • Hollywood
  • Netflix

संबंधित बातम्या

‘हिंदू मुलगा आणि मुस्लिम सून…’, सुनील लहरीच्या मुलाने सारा खानसोबत केले लग्न; यूजर्सने सुरु केली Trolling
1

‘हिंदू मुलगा आणि मुस्लिम सून…’, सुनील लहरीच्या मुलाने सारा खानसोबत केले लग्न; यूजर्सने सुरु केली Trolling

‘Overacting थांबवा ताई, ‘बिग बॉस’ संपले आता..’, तान्या मित्तलचा बदलला अंदाज; आधी पापाराझी आणि आता ड्रायव्हरलाही फटकारले
2

‘Overacting थांबवा ताई, ‘बिग बॉस’ संपले आता..’, तान्या मित्तलचा बदलला अंदाज; आधी पापाराझी आणि आता ड्रायव्हरलाही फटकारले

‘धुरंधर’चा बॉक्स ऑफिसवर धबधबा; अवघ्या ५ दिवसांत ओलांडला १५० कोटींचा आकडा, जाणून घ्या Worldwide Collection
3

‘धुरंधर’चा बॉक्स ऑफिसवर धबधबा; अवघ्या ५ दिवसांत ओलांडला १५० कोटींचा आकडा, जाणून घ्या Worldwide Collection

‘सिनेमांमुळे माझे अस्तित्व..’ रेड सी फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार मिळताच रेखा भावुक; आईचीही काढली आठवण
4

‘सिनेमांमुळे माझे अस्तित्व..’ रेड सी फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार मिळताच रेखा भावुक; आईचीही काढली आठवण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.