(फोटो सौजन्य - x अकाउंट)
२७ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रसारित झालेल्या लोकप्रिय वेब सिरीज ‘स्क्विड गेम सीझन ३’ ला रिलीज होऊन आता १० दिवस पूर्ण झाले आहेत. या सिरीजची क्रेझ अद्याप ओटीटी प्रेमींच्या डोक्यातून गेलेली नाही. आता या मालिकेने जबरदस्त विक्रम केला आहे. रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात, स्क्विड गेमचा तिसरा सीझन ९३ देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. यासह, ही मालिका आतापर्यंतच्या सर्वात लोकप्रिय इंग्रजी-नसलेल्या भाषिक मालिकांच्या यादीत समाविष्ट झाली आहे.
राज निदिमोरू आणि सामंथा गळ्यातगळे घालून दिसले एकत्र, अभिनेत्रीच्या पोस्टने वेधले लक्ष
शेवटच्या भागाला सर्वाधिक व्ह्यूज मिळाले
टाइम्स नाऊच्या अहवालानुसार, ‘स्क्विड गेम सीझन ३’ ला सध्या सर्वाधिक पसंती मिळत आहे. ही सिरीज रिलीज झाल्यापासून फक्त १० दिवसांतच त्याच्या शेवटच्या भागाला १०६.३ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत, जो या मालिकेसाठी एक मोठा विक्रम आहे. यापूर्वी, कोणत्याही भाषेतील नेटफ्लिक्स वेब सिरीजने दोन आठवड्यांत ही कामगिरी केलेली नाही जे ‘स्क्विड गेम सीझन ३’ करून दाखवला आहे.
कोणत्या सिरीजला किती व्ह्यूज मिळाले?
नेटफ्लिक्सवर इतर भाषांमधील प्रदर्शित झालेल्या वेब सिरीजमध्ये, स्क्विड गेम आणि वेन्सडे सीझन १ एकत्रितपणे १४२.६ दशलक्ष व्ह्यूज आहेत. दुसऱ्या क्रमांकावर अॅडलेसेन्स ही सिरीज आहे ज्याला १४२.६ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर स्ट्रेंजर थिंग्ज ४ आहे ज्याला १४०.७ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. डाहमर: मॉन्स्टरला ११५.६ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत, तर पाचव्या क्रमांकावर ब्रिजरटन सीझन १ आहे ज्याला ११३.३ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. या सगळ्या प्रसिद्ध वेब सिरीजमध्ये ‘स्क्विड गेम’ आपल्या नावाचा समावेश केला आहे.
सुयश टिळक- आयुशी भावेचं नातं फिस्कटले? अभिनेत्याच्या ‘त्या’ इन्स्टा पोस्टमुळे उडाली खळबळ
‘स्क्विड गेम ३’ ने मागील दोन्ही सीझनना मागे टाकले
स्क्विड गेमचा पहिला सीझन २०२१ मध्ये नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाला होता. हा सीझन चाहत्यांच्या पसंतीस आला. या सीझनचा दुसरा सीझन गेल्या वर्षी २०२४ मध्ये स्ट्रीम झाला होता, तर तिसरा सीझन यावर्षी २७ जून रोजी स्ट्रीम झाला होता. मागील दोन सीझनच्या तुलनेत तिसऱ्या सीझनला सर्वाधिक प्रेम मिळाले आहे. तसेच आता ‘स्क्विड गेम ३’ सीझन चाहत्यांच्या खूप पसंतीस आला आहे.