suyash tilak shocks fans with i am still single post aayushi bhave
मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आणि छोटा पडदा गाजवणारा सुयश टिळक कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतो. अभिनेत्याने आपल्या कुशल अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात घर निर्माण केलं आहे. सुयश एक सुप्रसिद्ध अभिनेता असून तो कायमच इन्स्टाग्रामवर आपल्या अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दलची माहिती शेअर करत असतो. याशिवाय, अभिनेता निसर्गसंवर्धन आणि वाईल्डलाईफ फोटोग्राफीविषयीच्या पोस्ट देखील तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. काही तासांपूर्वीच अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टच्या माध्यमातून अभिनेत्याने चाहत्यांना धक्का दिला आहे.
काही तासांपूर्वीच अभिनेत्याने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये अभिनेत्याने त्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यासोबत त्याने एक ऑडिओ सुद्धा वापरला आहे. शेअर केलेल्या पोस्टमधील ऑडिओ ऐकून अभिनेत्याच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. पोस्टमध्ये अभिनेता स्वत:ला सिंगल असल्याचं म्हणत आहे का, अशी शंका अनेकांनी उपस्थित केली आहे. ऑडिओमध्ये असं ऐकू येतं की, “हा फोटो मी सिंगल असतानाचा आहे…” यानंतर काही क्षणांसाठी शांतता असते आणि मग पुन्हा आवाज येतो… “हाहाहाहाहा…. कशाची वाट पाहताय? मी अजूनही सिंगलच आहे.” या ऑडिओमुळे सुयश अजूनही अविवाहित असल्याचं स्पष्ट करत आहे का, असा प्रश्न चाहत्यांना उपस्थित झाला आहे.
ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले ठरले ‘महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार’
अभिनेत्याच्या घटस्फोटाची चर्चा काही पहिल्यांदा होत नाही. गेल्या वर्षी त्याच्या वाढदिवशीही घटस्फोटाची चर्चा रंगली होती. त्याची पत्नी आयुषी भावे हिने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्यामुळे त्यांच्या नात्यामध्ये काही फिसकटलं असल्याची चर्चा झाली होती. २१ ऑक्टोबर २०२१ रोजी सुयश आणि आयुषीने आपल्या आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरूवात केली होती. त्या दोघांचीही पहिली ओळख एका ब्यूटी क्वीन स्पर्धेत झाली होती. लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांच्या नात्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू झाली. त्यांनी एकमेकांसोबतचे फोटोही सोशल मीडियावरून काढून टाकले आहेत. आयुषी किंवा सुयशने अद्याप ते दोघेही वेगळे झाले आहेत किंवा त्यांचा घटस्फोट झाला आहे, याबद्दलची अधिकृत माहिती दिलेली नाही.
सुयशने काही तासांपूर्वी शेअर केलेल्या पोस्टमुळे पुन्हा एकदा सुयश आणि आयुषीच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा होत आहे. सुयशच्या ह्या क्रिप्टिक पोस्टमुळे हे गूढ अधिकच वाढलं आहे.