Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बिन लग्नाची गोष्ट’साठी प्रिया-उमेशची निवड कशी झाली? दिग्दर्शक आदित्य इंगळेंनी सांगितली इनसाईड स्टोरी!

'बिन लग्नाची गोष्ट' या चित्रपटात प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या नैसर्गिक केमिस्ट्रीसोबत गिरीश ओक व निवेदिता सराफ यांचा अनुभवी अभिनय रंगत आणणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 30, 2025 | 04:59 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, त्याबद्दल मोठी चर्चा रंगली आहे. या चित्रपटात प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक अशी बलाढ्य कलाकारांची फळी झळकणार आहे. मात्र, सर्वांत मोठे आकर्षण ठरत आहे ते म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत यांची जोडी. या जोडीची केमिस्ट्री आधीपासूनच प्रेक्षकांना आवडते. पडद्यावर त्यांचा सहजसुंदर आणि नैसर्गिक अभिनय पाहून ते खऱ्या आयुष्यातलेच पात्र असल्याचा भास होतो, आणि हाच नैसर्गिकपणा दिग्दर्शक आदित्य इंगळे यांच्या नजरेत भरला.

Riteish Deshmukh : “मी प्रार्थना करतो आणि लवकरच यावर…”, रितेश देशमुखची मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत खास पोस्ट

दिग्दर्शक आदित्य इंगळे आपल्या निवडीबद्दल सांगतात की, “मी एकदा उमेश आणि प्रियाकडे जेवायला गेलो असताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बारकाईनं अभ्यास केला. प्रियाची शिस्त आणि उमेशचा सहज, गंमतीदार स्वभाव बघून मला वाटलं की, हे दोघं आशय आणि ऋतिकाच्या भूमिकांसाठी अगदी परफेक्ट आहेत. इतकं साम्य त्यांच्या वागण्यात होतं की दुसरा कोणताही पर्याय माझ्यासमोर राहिला नाही. मी त्यांना कथा ऐकवली, तेव्हा प्रिया गंमतीत म्हणाली ‘तू आधी मला बघितलं आणि मग हे पात्र लिहिलं ना?’ पण प्रत्यक्षात ही पात्रं आधीच लिहिलेली होती आणि त्यात उमेश-प्रिया अगदी फिट बसले.”

या चित्रपटात गिरीश ओक आणि निवेदिता सराफ ही लोकप्रिय जोडीदेखील झळकणार आहे. या दोन जोड्यांच्या अप्रतिम अभिनयामुळे चित्रपट रंगतदार होणार आहे, अशी खात्री प्रेक्षकांना आहे. गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाची कथा समीर कुलकर्णी यांनी लिहिली असून, दिग्दर्शनाची धुरा आदित्य इंगळे यांनी सांभाळली आहे.

Param Sundari : सिद्धार्थ मल्होत्रा ​​की जान्हवी कपूर, परम सुंदरीसाठी सर्वाधिक मानधन कोणाला मिळालं?

‘बिन लग्नाची गोष्ट’ या नावावरूनच हा चित्रपट नातेसंबंध, आयुष्याचा प्रवास आणि नात्यातील गमती-जमती सांगणारा असल्याचे दिसून येते. प्रिया-उमेशच्या नैसर्गिक केमिस्ट्रीसोबत गिरीश ओक आणि निवेदिता सराफ यांच्या अनुभवी अभिनयाचा संगम प्रेक्षकांना अविस्मरणीय अनुभव देणारा ठरणार आहे. त्यामुळे १२ सप्टेंबर रोजी हा चित्रपट नेमका काय नवा अनुभव देतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Web Title: How were priya umesh chosen for bin lagnachi gosht

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 04:59 PM

Topics:  

  • marathi movie

संबंधित बातम्या

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटातून उलगडणार गोड प्रेमाची गोष्ट, श्रमेश बेटकर दिसणार खास भूमिकेत
1

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटातून उलगडणार गोड प्रेमाची गोष्ट, श्रमेश बेटकर दिसणार खास भूमिकेत

कढीपत्ता! ‘अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी’, भूषण पाटीलच्या नव्या चित्रपटातून उलगडणार अनोखी प्रेमकहाणी
2

कढीपत्ता! ‘अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी’, भूषण पाटीलच्या नव्या चित्रपटातून उलगडणार अनोखी प्रेमकहाणी

‘टँगो मल्हार’ चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित
3

‘टँगो मल्हार’ चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

तुम्ही प्रेमात कुठपर्यंत जाता? ललित प्रभाकर-ऋता दुर्गुळेच्या ‘आरपार’ चित्रपटाचा भन्नाट टिझर रिलीज
4

तुम्ही प्रेमात कुठपर्यंत जाता? ललित प्रभाकर-ऋता दुर्गुळेच्या ‘आरपार’ चित्रपटाचा भन्नाट टिझर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.