
Sankarshan Karhade On Ashok Saraf: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Sankarshan Karhade On Ashok Saraf: मराठी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाने आणि विनोदाच्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याविषयी आजही अनेक कलाकारांच्या मनात विशेष आदर आणि आपुलकी आहे. Sankarshan Karhade
अशोक सराफ म्हणजे मराठी माणसाच्या घरातलं माणूस. त्यांचा विनोद, त्यांचं काम, हे सगळं लोकांना आजही आवडतं. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणं हीच अनेकांसाठी मोठी गोष्ट असते. अशोक सराफ यांच्यासोबत काम करतानाचे अनेक अनुभव कलाकार आवर्जून सांगतात. असाच एक भन्नाट आणि तितकाच जिव्हाळ्याचा किस्सा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितला आहे.
मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत संकर्षणने अशोक सराफ यांच्यासोबत काम करतानाच्या आठवणींना उजाळा दिला.मुंबई तकला मुलाखत देताना संकर्षणने अशोक सराफांबद्दल मनातलं सगळं बोलून दाखवलं. अशोक सराफ यांच्याविषयी बोलताना तो म्हणाला की, ते कुठेही असले तरी त्यांच्यासोबत चालावं, असं वाटतं.
ते कुठेही असले, तरी त्यांच्यासोबत जावं, त्यांच्यासोबत चालावं, असं वाटतं. त्यांच्यासोबत चार पावलं चालण्याची संधी मिळाली, तरी भविष्यात अभिमानाने सांगता येईल की, मी अशोक सराफ यांच्यासोबत चार पावलं चाललो आहे. फक्त 4 पावलं चाललो, तरी आयुष्यभर सांगत बसेन, इतका त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यांच्याविषयी कलाकारांच्या मनात असलेला आदर आणि प्रेम यातून स्पष्टपणे दिसून येतं.
यावेळी संकर्षणने सेटवरील एक मजेशीर प्रसंगही सांगितला. सेटवर एक सीन होता. एका सीनमध्ये अशोक सराफ आणि संकर्षण यांना स्कूटीवर बसायचं होतं. मात्र, अशोक सराफ यांनी धोतर नेसलेलं असल्यामुळे स्कूटीवर मागे बसताना अडचण निर्माण झाली.
Ashok Saraf: कुर्ता-धोतर नेसून लॅम्बोर्गिनीमध्ये बसले अशोक सराफ; स्वप्नील जोशीची कमेंट चर्चेत
अशोक सराफांनी धोतर नेसलं होतं. स्कूटीवर मागे बसायचं म्हटलं की धोतर अडकणार. स्कूटीचा मागचा भाग उंच असल्याने धोतर इंडिकेटर किंवा इतर भागात अडकण्याची शक्यता होती. त्यावेळी अशोक सराफ यांनी, ‘आता धोतर नेसून कसं बसू?’ असा प्रश्न विचारला.
सराफ स्वतःच म्हणाले, अरे धोतर घालून कसं बसू आता? त्यामुळे सेटवरील सगळ्यांनाच काय करावं, असा प्रश्न पडला. सगळेच विचारात पडले, आता काय करायचं?मात्र, अशोक सराफ यांनी स्वतःच यावर भन्नाट युक्ती शोधून काढली. त्यांनी स्कूटी स्टँडवर लावायला सांगितली. त्यानंतर आधी स्कूटीच्या पुढच्या बाजूला बसून हळूहळू मागे सरकण्याचा मार्ग त्यांनी निवडला.सराफांनी स्वतःच आयडिया काढली.
म्हणाले, आधी स्कूटी स्टँडवर लावा. मग मी पुढून बसतो, आणि हळूहळू मागे सरकतो. त्यांची ही अनोखी पद्धत पाहून सेटवरील सगळेच आश्चर्यचकित झाले.कामाप्रती असलेली धडपडच त्यांना मोठं बनवते!हा प्रसंग सांगताना संकर्षणने अशोक सराफ यांच्या कामाप्रती असलेल्या समर्पणाचंही कौतुक केलं.
एखादा सीन पूर्ण करण्यासाठी ते ज्या पद्धतीने मार्ग शोधतात, त्यांची ती धडपड कलाकारांना खूप काही शिकवणारी असल्याचं त्याने सांगितलं. अशोक सराफ हे कमी बोलूनही आपल्या मायेने माणसांना आपलंसं करणारे व्यक्तिमत्त्व असल्याचंही संकर्षण म्हणाला. ते फार बोलत नाहीत, पण त्यांच्या मायेने माणूस आपलासा होतो.
अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हे दोघे सध्या ‘आदि अनंत’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत.या दोघांचा नवा सिनेमा आला आहे . आदि अनंत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून संकर्षण कऱ्हाडेने पहिल्यांदाच चित्रपटाचे लेखन केले असून, त्याला अशोक सराफ यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि दिग्गज कलाकारासोबत अभिनय करण्याची संधी मिळाली आहे.
संकर्षणने पहिल्यांदाच सिनेमाचं लेखन केलंय. आणि पहिल्याचवेळी त्याला अशोक सराफांसोबत काम करायला मिळालंय. महेश लिमये यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात अशोक सराफ आजोबांच्या, तर संकर्षण कऱ्हाडे नातवाच्या भूमिकेत दिसत आहेत.सिनेमात अशोक सराफ आजोबा झालेत, आणि संकर्षण नातू झालाय. आजोबा आणि नातू यांच्यातील प्रेम, जिव्हाळा, विश्वास आणि भावनिक नात्याची सुंदर गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.सखी गोखले, वैदेही परशुरामी आणि कविता लाड यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘विनामूल्य मिळालेली नाती फार मोलाची असतात’ अशी या चित्रपटाची टॅगलाइन आहे. 12 नोव्हेंबर 2026 रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.