Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Columbus Marathi Movie Teaser: ब्रेकअप असो वा बेरोजगारीची उठ-बस, प्रत्येक समस्येवर ‘कोलंबस’चं जालीम औषध! टीझरची झलक आली समोर

Columbus Marathi Movie Teaser: अभिनेता अंकुर वाढवेच्या 'कोलंबस' या मराठी चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. रोजगाराच्या समस्येवर भाष्य करणारा हा चित्रपट ११ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 16, 2026 | 12:33 PM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Columbus Marathi Movie Teaser : मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता अशाच एका हटके कथानकाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कोलंबस’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिनेता अंकुर वाढवे या चित्रपटाच्या निमित्ताने एका अनोख्या इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कथानकाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट येत्या ११ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

काय आहे ‘कोलंबस’ चित्रपटाचे हटके कथानक?

‘कोलंबस’ चित्रपटाची कथा कैलास नावाच्या तरुणाभोवती फिरते. केवळ तीन फूट उंची असलेल्या कैलासने शिक्षक होण्याचे स्वप्न पाहिलेले असते. त्यासाठी त्याने उच्च शिक्षणही घेतलेले असते. मात्र, शिक्षणाचे खासगीकरण आणि सरकारी शिक्षक भरती न होणे अशा विविध अडचणींमुळे त्याचे शिक्षक होण्याचे स्वप्न अपूर्ण राहते. अशातच त्याला थेट अमेरिकेतून एका वेगळ्याच इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची संधी मिळते.

ही नेमकी कोणती इंडस्ट्री आहे? कैलास या संधीचा स्वीकार करतो का? या अनोख्या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय बदल होतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे चित्रपटातून मनोरंजक पद्धतीने उलगडणार आहेत.

 

अंकुर वाढवेसह दमदार कलाकारांची फौज

एस. एस. आर. फिल्म्स प्रस्तुत ‘कोलंबस’ या चित्रपटाची निर्मिती सतीश नाईक, रोहित गुप्ता आणि सनोबर लाकडावाला यांनी केली आहे. रवींद्र शिवाजी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात अंकुर वाढवे, रोहित माने, ‘सातारचा बच्चन’ म्हणून ओळखले जाणारे किरण माने, सिमरन खेडकर, अश्विनी भांडे, प्रसाद माने, हेमंत शिंदे, चंद्रकांत मोकल आणि संस्कार हिरे हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

चित्रपटाचे छायालेखन गौरव कुलकर्णी यांनी केले असून रोहन पाटील आणि सुयश जाधव यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे. वैभव शिरोळे यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे, तर चैतन्य पिसाळ यांनी लेखन आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शन केले आहे. रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. आनंद शिंदे आणि कैलास वाघमारे यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. मुकुंद हंगेकर यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे.

Mayuri Deshmukh: ‘खुलता कळी खुलेना’नंतर मालिकांपासून का दूर राहिली मयुरी देशमुख? अभिनेत्रीने सांगितलं खरं कारण

तरुणाई आणि रोजगाराच्या प्रश्नांवर भाष्य

‘कोलंबस’ हे केवळ मनोरंजन करणारे कथानक नसून त्यातून आजच्या तरुणाईची मनोवस्था, रोजगाराची समस्या आणि ग्रामीण भागातील परिस्थिती यांवरही भाष्य करण्यात आले आहे. शिक्षण घेऊनही नोकरी न मिळाल्यामुळे तरुणांसमोर निर्माण होणारे प्रश्न आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी करावे लागणारे वेगळे प्रयत्न या चित्रपटातून हलक्याफुलक्या शैलीत मांडण्यात आले आहेत. हटके कथानक, दमदार कलाकार आणि विनोदी मनोरंजनाची जोड असलेला ‘कोलंबस’ येत्या ११ डिसेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Diljit Dosanjh: ‘हिंदुस्तान कोणाच्या बापाचा नाही’; दिलजीत दोसांझचा विरोधकांना थेट इशारा? इंदूरमधील VIDEO व्हायरल!

Web Title: Columbus marathi movie teaser release ankur wadhave lead role

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 12:33 PM

Topics:  

  • Entertainmnet
  • marathi movie

संबंधित बातम्या

Kishor Kadam: ‘जिजाई’मधील किशोर कदम यांची भूमिका ठरणार खास; दिग्दर्शक तृशांत इंगळे यांनी सांगितलं कारण
1

Kishor Kadam: ‘जिजाई’मधील किशोर कदम यांची भूमिका ठरणार खास; दिग्दर्शक तृशांत इंगळे यांनी सांगितलं कारण

Chikeezing Marathi Movie: एका चिमुरड्याचं मोठं स्वप्न, संघर्ष आणि स्वप्नपूर्तीची गोष्ट; ‘चिकीझिंग’चा भावस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित
2

Chikeezing Marathi Movie: एका चिमुरड्याचं मोठं स्वप्न, संघर्ष आणि स्वप्नपूर्तीची गोष्ट; ‘चिकीझिंग’चा भावस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित

Shashank Shende: पैशांसाठी रक्ताची नातीही विसरतो माणूस! ‘अफरातफरी’च्या कथेबद्दल शशांक शेंडेंनी मांडले परखड मत
3

Shashank Shende: पैशांसाठी रक्ताची नातीही विसरतो माणूस! ‘अफरातफरी’च्या कथेबद्दल शशांक शेंडेंनी मांडले परखड मत

Gana Dhav Re Trailer: केदार शिंदेंच्या ‘गणा धाव रे’चा ट्रेलर प्रदर्शित; बाप्पाच्या कथेने जिंकले मन
4

Gana Dhav Re Trailer: केदार शिंदेंच्या ‘गणा धाव रे’चा ट्रेलर प्रदर्शित; बाप्पाच्या कथेने जिंकले मन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.