केजीएफच्या मेकर्सने हृतिक रोशनसोबत केली हातमिळवणी, 'वॉर २'पेक्षाही करणार जबरदस्त ॲक्शन
भारतीय मनोरंजनसृष्टीसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. सुपरस्टार हृतिक रोशन आणि देशातील सर्वात यशस्वी निर्मितीसंस्था होम्बले फिल्म्स यांनी एकत्र येत एक भव्य पॅन-इंडिया सिनेमा जाहीर केला आहे. हा प्रकल्प भविष्यातील सर्वांत मोठ्या सिनेमांपैकी एक ठरणार असल्याची खात्री आहे.
होम्बले फिल्म्स आणि हृतिक रोशन हे दोन दिग्गज आता एकत्र आल्याने चाहत्यांमध्ये आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीत उत्साहाचं वातावरण आहे. होम्बले फिल्म्सने ‘केजीएफ चॅप्टर 1 आणि 2’, ‘कांतारा’, आणि ‘सालार: पार्ट 1 – सीजफायर’ सारख्या अभूतपूर्व यशस्वी चित्रपटांच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीत नवे मापदंड निर्माण केले आहेत.
बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, अनुराग कश्यपच्या चित्रपटातून करणार डेब्यू
या सहकार्याबद्दल होम्बळे फिल्म्सचे संस्थापक विजय किराजंदूर म्हणतात,” या सहकार्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. होम्बळे फिल्म्समध्ये आमचं उद्दिष्ट नेहमीच प्रेरणादायी आणि सीमारेषा ओलांडणाऱ्या कथा सांगण्याचं राहिलं आहे. हृतिक रोशनसारख्या कलात्मकतेने परिपूर्ण कलाकारासोबत काम करणं ही या दृष्टिकोनात एक महत्त्वाची पायरी आहे. आम्ही एक असं भव्य आणि कालातीत अनुभव प्रेक्षकांना देण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
हृतिक रोशन यांनीही यावर आपली भावना व्यक्त करत म्हटलं, “होम्बले फिल्म्सने आजवर अनेक वैशिष्ट्यपूर्ण कथा सादर केल्या आहेत. त्यांच्या टीमसोबत काम करण्याची उत्सुकता मला आहे. आम्ही एकत्रितपणे एक असं सिनेमॅटिक अनुभव प्रेक्षकांसमोर आणू इच्छितो जे भव्य असेल आणि प्रत्येकाच्या मनात ठसे उमटवेल. आम्ही मोठं स्वप्न पाहत आहोत आणि ते सत्यात उतरवण्यासाठी कटिबद्ध आहोत.”
‘जवान’ दिग्दर्शकाचा मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान
हृतिक रोशन, जे आजच्या घडीला भारतातील सर्वात लोकप्रिय आणि प्रतिभावान सुपरस्टार्सपैकी एक आहेत, त्यांच्या आगामी चित्रपटांची यादी देखील प्रचंड उत्साहजनक आहे — विशेषतः वॉर २ आणि क्रिश ४ या चित्रपटांची प्रतीक्षा सर्वत्र होत आहे.
हृतिक रोशन आणि होम्बले फिल्म्स यांचं हे ऐतिहासिक सहकार्य निश्चितच भारतीय सिनेसृष्टीला नवीन उंचीवर घेऊन जाणार आहे. या चित्रपटाबाबतचे अधिक तपशील लवकरच जाहीर केले जातील.